उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पीडित तरूणी ही अभियांत्रिकेचे शिक्षण घेत होती.त्यावेळी तिची ओळख एका तरुणासोबत झाली.ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.मात्र तरुणाने लग्नास टाळाटाळ करण्यास सुरूवात केली.तरूणीने लग्नासाठी त्याला गळ घातली.त्यावेळी त्याने लग्नास नकार दिले.खचलेल्या तरूणीने आत्महत्येचा प्रयत्नही केला.मात्र सुदैवाने ती बचावली.तरूणी त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी भंडारा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.अशोक बागूल यांचेकडे गेली असता त्यांनी शरीर सुखाची मागणी केली.अशा पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हे कृत्य घृणास्पद असून अशोभनीय आहे.अशा अधिकाऱ्यांमुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलीन होत आहे.अशा बेजबाबदार पोलिस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे भंडारा पोलिस उपविभागीय अधिकारी अशोक बागूल यांना तत्काळ निलंबित करून सेवेतून बडतर्फ करावे; अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे पोलिस महासंचालक व पोलिस उपमहानिरीक्षक यांच्याकडे केली आहे.

