Wednesday, September 23, 2026
Homeगडचिरोली२ लाखांचे बक्षिस असलेल्या जहाल नक्षलवाद्याने केले आत्मसमर्पण…

२ लाखांचे बक्षिस असलेल्या जहाल नक्षलवाद्याने केले आत्मसमर्पण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- चकमक,खून,जाळपोळीसह विविध हिंसात्मक कारवायात सहभागी असलेल्या एका जहाल नक्षल्याने काल,सोमवारी,दि.१० जून रोजी केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.किशोर ऊर्फ मुकेश पेन्टा कन्नाके वय ३७ वर्षे रा. नेलगुंडा, ता.भामरागड, जि.गडचिरोली असे आत्मसमर्पित नक्षल्याचे नाव असून; त्याच्यावर शासनाने तब्बल २ लाखांचे बक्षिस जाहीर केले होते.

किशोर ऊर्फ मुके कन्नाके हा २०१४ मध्ये जनमिलिशिया सदस्य म्हणून भामरागड दलममध्ये भरती झाला.२०१५ मध्ये डीएकेएमएस (दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटना) मध्ये अध्यक्ष पदावर पदोन्नती होऊन सन २०१८ पर्यंत कार्यरत होता.त्यानंतर २०२२ पासून तो भामरागड दलम सदस्य व आरपीसी (रक्षा पार्टी कमिटी/रिवॉल्युशनरी पिपल काउंसिल) सदस्य म्हणून कार्यरत राहिला. २०१७ मध्ये दरबा पहाडी जंगल परिसरात झालेली चकमक,२०२१ मध्ये कोपर्शी जंगल परिसरातील चकमक तसेच २०२२ मध्ये पेनगुंडा जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. यासोबतच २०२१ मध्ये कोठी ते कोठी टोला मार्गावर नक्षली बॅनर व पत्रके लावणे,२०२३ मध्ये नेलगुंडा जंगल परिसरात जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्यातही त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने २ लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.सोमवारी,किशोर कन्नाके याने केंद्रीय राखीव पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक जगदीश मीणा यांच्यापुढे त्याने आत्मसमर्पण केले.त्यानंतर त्याला गडचिरोली जिल्हा पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. नक्षली आत्मसमर्पणाची प्रकिया पोलिस महानिरीक्षक (नक्षल विरोधी अभियान) नागपूर संदिप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल,पोलिस अधीक्षक नीलोत्पल,कमांण्डट ३७ बटा. सिआरपीएफ पोलिस अधीक्षक एम.एच.खोब्रागडे, विशेष कृती दल नागपूरचे संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.त्याच्या पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन किशोरला ४ लाख ५० हजार रुपये बक्षीस जाहिर करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!