- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-शेतकऱ्यांनी शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या कृषी पंपांच्या नवीन वीज जोडणीसाठी पाच वर्षांपूर्वी त्या-त्या तालुक्यातील विद्युत वितरण कंपनीकडे अर्ज सादर केली.त्यानुसार वितरण कंपनीला मागणी देयकही भरले.मात्र,अजून पर्यंत वीज वितरण कंपनीने कृषी पंपांची जोडणी करून दिलेली नाही.अश्यातच आता कृषी पंपांच्या वीज जोडणीसाठी पाच वर्षांपूर्वी मागणी देयक भरलेल्या शेतकऱ्यांना सोलर पंप घ्यावे,अश्या सूचना विद्युत वितरण कंपनी करीत असल्याने अगोदरच विहिरीतील तसेच इतर ठिकाणातील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने शेतकऱ्यांसाठी सोलर पंप उपयोगी पडणार नाही; त्यामुळे उद्या,सोमवार १ जून रोजी शेतकऱ्यांसोबत चर्चा विनिमय करण्याकरीता दुपारी १२ वाजेच्या सुमारास देसाईगंज शहराच्या हुतात्मा स्मारक जवळील सिंधी भवन येथे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.सदर बैठकीस देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची सह धानोरा तालुक्यातील पिडीत शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
- Advertisement -

