Saturday, September 12, 2026
Homeगडचिरोलीबेरोजगार आदिवासी युवक-युवतींसाठी विविध व्यवसायांसाठी मिळणार आर्थिक मदत.. - शेतकऱ्यांसाठी ताडपत्री,स्प्रे पंप,काटेरी...

बेरोजगार आदिवासी युवक-युवतींसाठी विविध व्यवसायांसाठी मिळणार आर्थिक मदत.. – शेतकऱ्यांसाठी ताडपत्री,स्प्रे पंप,काटेरी तार; १५ जुलै अंतिम तारीख..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीच्या नागरिकांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता विविध उत्पन्नवाढीच्या योजनांसाठी केंद्रवर्ती अर्थसंकल्पातून अर्थसहाय्य दिले जाणार आहे.या योजनांमध्ये बेरोजगार आदिवासी युवक-युवतींसाठी विविध व्यवसायांसाठी आर्थिक मदत, शेतकऱ्यांसाठी ताडपत्री,स्प्रे पंप,काटेरी तार,मोहफुल-निंबोळ्या जमा करण्यासाठी जाळी,थ्रेशर मशीन, फळबाग लागवडीसाठी साहित्य तसेच मत्स्यसंवर्धनासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी ८५ टक्क्यांपर्यंत व काही बाबतीत १०० टक्के अनुदानावर अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे.सुशिक्षित बेरोजगार दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आणि वनपट्टाधारक शेतकऱ्यांसाठी शेत सपाटीकरणासारख्या योजनांचा समावेश असून,महिला बचत गटांसाठी देखील विशेष प्रोत्साहन दिले जाणार आहे.अर्जदारांकडून अनुसूचित जमातीचा दाखला (उपविभागीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह),रहिवासी दाखला,चालू वर्षातील उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार स्वाक्षरीसह), ग्रामसभा ठराव, आधार कार्ड,आधार लिंक असलेल्या बँक खात्याची छायांकित प्रत व इतर संबंधित कागदपत्रे आवश्यक आहेत.विधवा,परित्यक्त्या,अपंग आणि वनहक्क पट्टाधारक लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रमाणपत्रांची मागणी करण्यात आली आहे.या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी www.nbtribal.in या अधिकृत पोर्टलवर दिनांक १५ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत,तसेच अधीक माहितीकरिता संबंधित प्रकल्प कार्यालयात संपर्क करावा,असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!