Saturday, May 23, 2026
Homeदेसाईगंजउद्याला कुरुड गावात गौतमी पाटीलचा जलवा..!

उद्याला कुरुड गावात गौतमी पाटीलचा जलवा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथे परंपरेनुसार मकरसंक्रांतीपासूनच्या चौथ्या गुरुवारी म्हणजेच यंदा उद्या,गुरुवार ५ फेब्रुवारीला शंकरपटाचा धरार रंगणार असून परिसरातील अनेक नामांकित बैलांच्या जोड्या आपला वेग आणि ताकद दाखवणार असल्याने शंकरपटासह नाटकांचा आनंद घेण्यासाठी गावात मित्रमंडळी,नातेवाईक आणि पाहुण्यांची रेलचेल वाढली आहे.यामुळे कुरुड गावात एखाद्या सणासारखे वातावरण निर्माण झाले आहे.अश्यातच महाराष्ट्राची मराठमोळी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या प्रांगणावर नृत्यरुपी “पाटलांचा बैल गाडा,त्यानं शेतात केलाय राडा,” व विविध गाण्यांवर जलवा दाखविणार असल्याने यंदाच्या शंकरपटास अनोखा माहोल तयार झाल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे,देसाईगंजच्या कुरुड गावात ८० च्या दशकात एकाच रात्री ८ ते १० नाट्यप्रयोगाची सुरू झालेली परंपरा यावर्षी देखील कायम राहणार आहे.या परंपरेनुसार यावर्षी गावात नऊ नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.यात पंचशील नाट्य कला मंडळ,श्री बाल नभो नाट्य कला मंडळ,श्री दत्त प्रासादिक नाट्य समाज पारधी मोहल्ला,श्री दत्त प्रासादिक नाट्य समाज मोहल्ला,नुतन शेतकरी नाट्य संपदा कांबळी मोहल्ला,तर श्रीराम मंदिर देवस्थान कमेटी सुभाष वार्ड मंडळाच्या वतीने एकूण ६ नाट्यप्रयोगाचे खेळ रंगणार आहेत,तर गौतमी पाटिलचा डान्स हंगामा व ईतर दोन डान्स हंगामे,असे एकूण नऊ प्रयोगांचे आयोजन रसिक जणांसाठी करण्यात आले असल्याने उद्याचा दिवस कुरूड वासियांसह परिसरातील नागरिकांसाठी जणूकाही नवपर्वणीचा ठरणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

इंधन दरवाढीचा थेट परिणाम आता शेतीच्या कामांवर..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी तीन रुपयांची वाढ झाल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक,शेतकरी व मजुरांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची...

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!