Monday, September 7, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या दोन हजाराची प्रतीक्षा..!

शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या दोन हजाराची प्रतीक्षा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सरू केली.योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता वितरित करण्यात आला आहे; मात्र,राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता अद्याप जमा न झाल्याने होत असलेला विलंब शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. विशेष म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ८ वा हप्ता जमा होईल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती; मात्र ती अद्याप फोल ठरू लागली आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत राज्य सरकार वर्षाला प्रत्येकी दोन हजार रुपये तीन हप्त्यात पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करते. योजनेतून अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे.मात्र,अद्याप अजूनही आठव्या हप्त्याची दोन हजार रुपये जमा करण्यात आले नसल्याने आणखी किती दिवस वाट पहावी?असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात घर करून सोडत आहे.त्यातच,नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता नेमका कधी जमा होणार? असाही प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. दुसरीकडे,वाढती महागाई,खत-बियाण्यांचे दर,कर्जाचा बोजा आणि नैसर्गिक संकटांचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निधी अत्यंत महत्त्वाचा आहे.त्यामुळे हप्ता तातडीने जमा करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून जोर धरू लागली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

देसाईगंजच्या जुनी वडसा येथील सिटी सर्व्हे प्रक्रिया अंतिम टप्प्यात; हरकतींसाठी पंधरा दिवसांची मुदत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भूमी अभिलेख विभागामार्फत देसाईगंज शहराच्या मौजा-जुनी वडसा येथील नगर भूमापन(सिटी सर्व्हे)प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, जमीनधारकांचे हक्क व सीमा दर्शविणारा प्रारूप...

मध्यरात्री तरुणाचा धारदार शस्त्राने खून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना नागपूर शहराच्या सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमदार निवासस्थानाजवळील एका गल्लीत मध्यरात्रीच्या...

सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सणावर महागाईचे सावट..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात वर्षभर खांद्याला-खांदा लावून राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे.मात्र,यंदा पोळ्याच्या उत्साहावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!