Sunday, September 6, 2026
Homeगोंदिया२८ वर्षीय महिलेची हत्या; जंगलात आढळला मृतदेह..

२८ वर्षीय महिलेची हत्या; जंगलात आढळला मृतदेह..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-तब्बल सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका २८ वर्षीय महिलेचा मृतदेह मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या मार्गावरील बोंडराणी जंगलात संशयास्पद स्थितीत आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली. महिलेच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकल्याचे व शरीरावर जखमा असल्याचे आढळल्याने अज्ञाताने महिलेचा खून करून मृतदेह जंगलात फेकून दिल्याचे मृतदेहाच्या पाहणीवरून स्पष्ट झाले.पूनम राकेश तुमाने वय २८ वर्षे रा.खैरी,बालाघाट असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून मध्यप्रदेश राज्यातील बालघाट जिल्ह्यातील पूनम राकेश तुमाने ही महिला २८ जानेवारी रोजी गावातीलच संजय तितमारे याच्यासोबत वाराशिवनी न्यायालयात पेशी असल्याचे सांगून घरून निघाली होती.यानंतर पूनम व संजय हे दोघेही २८ जानेवारीला गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील परसवाडा टी पॉइंटवर गेले.तिथून पूनमने आपल्या आईला घरी येणार आहे; एवढे सांगून फोन कट केला.मात्र,रात्री उशिरापर्यंत पूनम घरी परतली नाही.संजयने पूनमच्या घरी जाऊन तुमची मुलगी माझ्यासोबत परत आली नाही.ती घरी आली कां?अशी विचारणा पूनमच्या वडिलांना केली. यानंतर ते वाराशिवणी व रामपायलीकडे पूनमचा शोध घेण्यासाठी निघाले.पण,तिचा शोध न लागल्याने बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी पोलिस स्टेशन येथे ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.यानंतर पोलिसांनी पूनमचा शोध घेण्यास सुरुवात केली. अश्यातच काल मंगळवारी दुपारच्या सुमारास बोंडराणी जंगलाकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यालगत पळसाच्या झाडाखाली एका महिलेचा मृतदेह चंद्रकुमार भगत या शेतकऱ्याला दिसून आला असता याची माहिती गावकरी व दवनीवाडा पोलिसांना दिली.बोंडराणी परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली.महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर दवनीवाडा पोलिसांनी खैरलांजी व मध्यप्रदेश पोलिसांशी संपर्क साधला.त्यानंतर पूनमचे कुटुंबीयसुद्धा मृतदेह पाहण्यासाठी बोंडराणी येथे पोहचले.त्यांनी तो मृतदेह पूनमचा असल्याचे पोलिसांना सांगितले.यानंतरच हा मृतदेह बेपत्ता असलेल्या पूनम तुमाने या महिलेचा असल्याचे स्पष्ट झाले.घटनेची माहिती मिळताच दवनीवाडा पोलिस व उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर,पोलिस निरीक्षक वैशाली ढाले,सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय टेकाम घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचा पंचनामा करून याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.घटनेचा पुढील तपास दवनीवाडा पोलिस करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!