Sunday, June 28, 2026
Homeभंडाराउकळत्या पाण्याच्या बालटीत पडून चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू...

उकळत्या पाण्याच्या बालटीत पडून चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-चार वर्षीय चिमुकल्याचा उकळत्या पाण्याच्या बालटीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,शुक्रवारी २० डिसेंबरला सकाळच्या सुमारास तुमसर तालुक्याच्या डोंगरी बुज.येथे घडली.रिधाणा प्रमोद शेंद्रे वय ४ वर्षे रा.डोंगरी बुज.ता.तुमसर असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून थंडीचा जोर सर्वत्र कायम आहे.त्यामुळे थंडीच्या दिवसांत ग्रामीण भागांमध्ये सकाळच्या सुमारास पाणी गरम करून आंघोळ वा इतर क्रिया केल्या जातात.त्यानुसार आज सकाळच्या सुमारास डोंगरी बुज.येथील शेंद्रे कुटुंबीयांनी स्वयंपाक खोलीमध्ये पाणी गरम करून एका बालटीत ठेवले होते.अशातच रिधाणा हा आपल्या घरीच खेळत होता. खेळता-खेळता तो स्वयंपाक खोलीमध्ये ठेवलेल्या उकळत्या पाण्याच्या बालटीत पडला.त्यात त्याचे शरीर गळ्यापासून पायापर्यंत गंभीररित्या भाजले गेले.कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी रिधाणा यास सर्वप्रथम तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.नंतर तुमसर रुग्णालयातून भंडारा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.रिधाणाचे शरीर गंभीररीत्या भाजल्याने त्याला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. प्रसंगी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर मोठा आघात झाला.याप्रकरणी गोबरवाही पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याला चुना.. – सायबर चोरट्यांनी ९ लाख ९७ हजार उडवले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका धान्य व्यापाऱ्याची तब्बल ९ लाख ९७ हजार ७८० रुपयांची फसवणूक केली.या प्रकरणी...

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर...

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!