Tuesday, June 23, 2026
Homeआरमोरीआरमोरीच्या शिवणी येथील आरोग्य शिबिरात ७५ वर्षीय आजी झाली भावूक…-रामदास मसराम यांनी...

आरमोरीच्या शिवणी येथील आरोग्य शिबिरात ७५ वर्षीय आजी झाली भावूक…-रामदास मसराम यांनी दिला धीर; शिबिरात १३५६ रुग्णांनी घेतला लाभ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

आरमोरी(गडचिरोली) :- शेतकरी नेते तथा काँग्रेसचे रामदास मसराम व मित्र परिवार यांनी गोर-गरीब जनतेसाठी तसेच शेतकरी बांधवांना पावसाळ्यामध्ये आरोग्याची समस्या उद्भवू नये; याकरीता गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज,आरमोरी व इतर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.आरमोरी तालुक्याच्या शिवणी येथे नुकतेच आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले असून सदर आरोग्य तपासणी शिबिरात शिवणी,सायगाव,वघाळा व परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदवून मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधी वाटप,नेत्र उपचार, मोफत चष्मे वाटप व सामान्य रोगांची तपासणीत १३५६ रुग्णांनी लाभ घेतला आहे.अशातच एक ७५ वर्षीय आजी मोफत शिबिराचे लाभ प्रसंगी शिबिरा दरम्यान आली.शेतकरी नेते रामदास मसराम यांच्याशी चर्चा करीत असतांना भाऊक होऊन तिला अश्रू अनावर झाले आणि असेच कार्य करीत रहा,भगवंत तुम्हाला मोठे करील,असे म्हणीत आजीने हृदयातून भावना व्यक्त करीत मसराम यांना आशीर्वाद दिला. मसराम यांनी आजीला धीर देत आर्थिक मदत केली.यातून मसराम यांची जनतेप्रती असलेली कळकळ लक्षात येते.

शिबिरात ७८४ रुग्णांची नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.२९० रुग्णांची सामान्य तपासणी करून त्यांना मोफत औषधी वितरण करण्यात आली तर १०७ रुग्णांची बिएमडी मशिन द्वारे तपासणी करून त्यांना औषधोपचार पुरविण्यात आला.हृदय रोगाच्या रुग्णांची तपासणी करून १० रुग्णांना मोफत औषधोपचार तथा पुढिल आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे मार्गदर्शन तसेच १८ मोतीबिंदु रुग्णांची तपासणी करून त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी पुढील व्यवस्थेचे मार्गदर्शन केले.४५ रुग्णांची इसिजी,तर १५ रुग्ण मुत्र खड्याचे तसेच २३ रुग्णांमध्ये स्त्रीरोग रुग्ण तपासण्यात आले.मोफत शिबिर प्रसंगी ओबीसी समाजाचे कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्त्यांसह ११ रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

आरोग्य शिबिराचे आयोजक काँग्रेस नेते रामदास मसराम यांचेसह शिबिराचे उदघाटक डॉ.महेश कोपुलवार,अध्यक्ष पुरषोतम दोनाडकर सरपंच शिवणी,प्रमुख अतिथी परसराम टिकले,सुरेश ढोरे, केशवराव ठाकरे कासवी,रामदास दोनाडकर वघाडा, धनराज दोनाडकर वघाडा,अण्णाजी लिंगायत, ऋषीजी मातेरे, बळीराम ठाकरे,विनायक पत्रे, पुरषोत्तम माकडे,गौरीताई बुल्ले,जोतीताई बांडे, प्रभाबाई राऊत,प्रणिता बगमारे,प्रेमिला मेश्राम, सदाशिव मेश्राम,मनोहर राऊत,नानाजी बगमारे आदी उपस्थित होते.आरोग्य शिबिराला नागपूरच्या सुप्रसिद्ध असलेल्या श्युअरटेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटच्या तज्ञ डॉक्टरांच्या चमुसह जिल्हा रुग्णालय गडचिरोलीचे तज्ञ डॉक्टर,आरोग्य कर्मचारी तसेच देसाईगंज ग्रामिण रुग्णालयाचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवा प्रदान केली. 

शिबिराचे यशस्वीतेसाठी सागर वाढई,स्वप्नील मिसार, गौरव शिलार,शैलेश येलगंधवार,कमलेश बारस्कर, शेखर कुथे,उमाकांत दोनाडकर,चरण दोनाडकर, रामदास बाडे,पुरुषोत्तम वेध्य,चागदेव राऊत,गजानन बाडे,विलास पत्रे,रमेश चोधरी,रामदेव बगमारे,आकाश पेटकुले,रोशन कवासे,दुषांत वाडगुरे यांचेसह युवा कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-१७ जागांचा निकाल जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील १७ विधान परिषदेच्या जागांपैकी ६ जागांवर महायुतीने आधीच बिनविरोध विजय मिळवला.अश्यातच आज,सोमवार २२ जून रोजी ११ स्थानिक स्वराज्य संस्था...

राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मोहिम.. – गडचिरोलीत वृक्ष लागवडयोग्य जमिनीची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी मोहिम हाती घेतली आहे.या मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात व्यापक वृक्षारोपणासाठी उपलब्ध शासकीय जमिनींची प्रत्यक्ष...

देसाईगंज पोलिसांची धडक कारवाई; दारु तस्कराच्या आवळल्या मुसक्या.. – सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यातील दारु विक्रिवर प्रतिबंध लावण्यासाठी देसाईगंज पोलिसांनी धडक मोहिम हाती घेतली असुन एका दारु तस्कराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे....

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी एकलव्य व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे क्रीडा,विज्ञान व कला क्षेत्रात करणार मॅपिंग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल निवासी विद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या क्रीडा,विज्ञान तसेच कला व संस्कृती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!