Thursday, August 27, 2026
Homeआरमोरीआरमोरीच्या तरुणाने रक्तदानाने साजरा केला वडिलांचा वाढदिवस..!

आरमोरीच्या तरुणाने रक्तदानाने साजरा केला वडिलांचा वाढदिवस..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-आई-वडील आपल्या मुलांसाठी जीवाचे रान करून लहाण्यांचे मोठे करतात.मुले कितीही मोठी झालीत,तरीही ती आई-वडिलांसाठी लहानच असतात.हल्ली नवे युग सुरू आहे.नव्या युगात तरुण-तरुणींचे वाढदिवस मोठ्या प्रमाणावर सर्वत्र साजरे करण्यात येतात.यात पार्ट्या, डीजे,नाचगाणी व इतर कार्यक्रम घेत आनंदी-आनंद मनवले जाते.काही आई-वडिल स्वतः आपले वाढदिवस साजरे न करता मुलांचे वाढदिवस साजरे करीत असतात.अशातच आरमोरीच्या तरुणाने वडिलांच्या वाढदिवस दिनी वडिलांना सन्मान देण्यासाठी आज,गुरुवार ३ एप्रिल रोजी आपल्या वडिलांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केल्याने याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.आरमोरी शहरात वास्तव्यास असणाऱ्या सारंग नरेंद्र जांभुळे या तरुणाने आज गुरुवारी सर्वप्रथम वडिल नरेंद्र जांभुळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्या.त्यातच वडिलांना सन्मान देण्यासाठी त्याने आपले पहिले रक्तदान केले. विशेष म्हणजे,एका छोट्या मुलीला रक्ताची गरज भासली.त्यामुळे सारंगने वडीलांसमवेत रुग्णालय गाठून रक्तदान केले.तरुणाच्या या कृतीने समाजाला एक प्रेरणादायी संदेश मिळाला आहे.
आरमोरी शहरातील तरुण,सारंग नरेंद्र जांभुळे👇
“माझ्या वडिलांनी मला नेहमीच इतरांना मदत करण्याची शिकवण दिली.त्यांच्या वाढदिवसाला मी रक्तदान करून त्यांचा सन्मान करायचे ठरवले.माझे रक्त एका लहान मुलीला उपयोगी पडले,हे पाहून मला खूप समाधान वाटले,”
रक्तदान हे एक असे दान आहे,जे थेट एखाद्याचे प्राण वाचवू शकते.डॉक्टरांच्या मते,एका व्यक्तीच्या रक्तदानाने तीन जणांचे जीव वाचवले जाऊ शकते. अनेकांना रक्तदानाबद्दल भीती किंवा गैरसमज असतो.मात्र,’रक्तदान हेच खरे श्रेष्ठ दान’ आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!