Thursday, August 27, 2026
Homeभंडाराअंगावर विज कोसळून एकाच गावातील दोन शेतकरी ठार..

अंगावर विज कोसळून एकाच गावातील दोन शेतकरी ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार विदर्भातील अनेक जिल्ह्यात कुठे हाय अलर्ट तर कुठे यलो अलर्ट जारी करण्यात आला व  वादळी वारे,गारपीट,विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसू लागला.अशातच आज,गुरुवार ३ एप्रिलला भंडारा जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती.त्यातच शेत कामावर गेलेल्या दोन शेतकऱ्यांच्या अंगावर विज कोसळल्याने दोन्ही शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवारी दुपारच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील पाथरी येथे घडली.प्रमोद मनिराम नागपुरे वय ४५ वर्षे,व मनिषा भारत पुष्पतोडे वय २८ वर्षे दोघेही रा.पाथरी, ता.तुमसर असे वीज कोसळून ठार झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
माहितीनुसार,आज सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.पावसाची उघडीप सुरू असल्याने शेतकरी प्रमोद नागपुरे व मनिषा पुष्पतोडे दुपारच्या सुमारास शेतावर गेले होते.शेतात काम करीत असतांना पाऊस बरसु लागला.त्यामुळे दोन्ही शेतकरी पाऊस उघडेपर्यंत शेतालगतच्या झाडाखाली असलेल्या झोपडीत गेले.काहीकाळ झोपडीत असतांना आकाशात विजांच्या कडकडाटासह आवाज होत वीज झाडाखाली असलेल्या झोपडीवर पडली.वीज झोपडीवर कोसळताच दोन्ही शेतकरी जागीच गतप्राण झाले.घटनेची माहिती गावामध्ये पसरताच ग्रामस्थ,पोलीस पाटील, तहसीलदार, तलाठी तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी झाले. काहीकाळ बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.मृतांचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले.सदर घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!