Saturday, July 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमोबाईल शाप की वरदान.? - इवल्याश्या उपकरणाने संपूर्ण जग पादाक्रांत ..

मोबाईल शाप की वरदान.? – इवल्याश्या उपकरणाने संपूर्ण जग पादाक्रांत ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
विशेष प्रतिनिधी/ प्रियंका ठाकरे
लेख :-मनुष्याने लावलेल्या अनेक शोधांमध्ये भ्रमण दूरध्वनीचा म्हणजेच मोबाईलचा शोध हा सर्वात महान शोध म्हणावा लागेल.पुराणकथेतील वामनाने साडेतीन पावलांमध्ये सर्व विश्व पादाक्रांत केल्याचे सांगितले जाते.पण भ्रमणध्वनीच्या इवल्याश्या उपकरणाने  एका पावलात अक्षरशः संपूर्ण जग पादाक्रांत केले आहे.आज श्रीमंतांपासून ते सर्वसामान्य,गोर-गरीबांकडे सर्वांच्या खिशात हा मोबाईल दिसून येतो. त्याशिवाय हल्ली कोणाचे पानही हलत नाही.
या मोबाईलने अल्पावधीतच आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे.सर्व जग या मोबाइलचे पुर्णपणे गुलाम झालेले दिसत आहे.कुठेही जा,लोक मोबाईलवरून कुणाशी ना कुणाशी सतत बोलत असतात.त्यातच चालतांना,गाडी चालवतांना आणि एकही क्षण वाया जाऊ न देता मोबाईलचा वापर वाढलेला आहे.याचमुळे बऱ्याचदा अपघात सुध्दा होतात.आजकाल मोबाईलमुळे नात्यांमध्ये भावनिक दृष्ट्या दुरुवापणा वाढू लागला.नात्यांमधला जो काही गोडवा तयार झालेला होता तोही आजकाल बघायला पण मिळेना.मोबाईलचे शारीरिक दुष्परिणाम होऊ लागले आहे.हे उपकरण सतत कानाला लाऊन ठेवल्यामुळे विशिष्ट किरण मेंदूवर वाईट परिणाम करतात.आजकाल सोशल मीडियाचा वापर करून मोबाईल वरून फेसबुक,इंस्टाग्राम आणि इतर ॲप च्या माध्यमातून एखाद्या मुलीच्या फोटोला बदनामिसाठी वापर करतात.तर अश्लील व्हिडिओ आणि संदेश सुध्दा पाठवतात.बदनामिसाठी, अंधश्रध्दा पसरविण्यासाठी,तर परीक्षेत गैरव्यवहार करण्यासाठी,ओटीपी स्कॅम,बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी आणि अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसाठी मोबाईल फोन हे देवदूत ठरले आहे.त्यामुळे एक नजर टाकली तर मोबाईल शाप तर नाही ना..!
आजच्या या अत्याधुनिक जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे मोबाईल झालेला आहे.सर्व साधनाच्या पेटाऱ्यात आज मोबाईल शिवाय दुसरा पर्यायच उरला नाही.प्रत्येक कामात,घरात पुढाकार मोबाईलचाच असतो.वेळ बघण्यासाठी तो आज घड्याळ झालाय, तारीख बघायला तो कॅलेंडर झालाय,मजकूर पाठवायला तर तो पोस्टकार्डच बनलाय,भूक लागली की लगेच झोमाटो वर ऑर्डर करून जेवण मागवतो, तर सतत उभे राहून लग्नाची वा इतर खरेदी करायचे असेल तर आज मीशो,फ्लिकॉर्ट,इत्यादी वेब साईट तयार आहेत.एवढेच नाही तर दोन-दोन तास लांब रांगेत उभे न राहता रेशन केवायसी,इलेक्ट्रिक बिल, पैश्याची देवाण घेवाण,बँकेचे व्यवहार आपण सहजरित्या घरी बसून करू करीत आहोत.तसेच ऑनलाईन अभ्यास,ऑनलाईन कामे,ऑनलाईन रेल्वेची तिकीट काढणे,कोसो दूर असलेल्या व्यक्तीला आज आपण एका सेकंद मध्ये कॉल करून बोलू शकतो व बघू शकतो.वृध्द काळात एकट्या व्यक्तींना हा मोबाईल आज खूप आधार झालेला आहे.एखाद्या व्यक्तीला रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर  पोहचविणारे एकमेव माध्यम म्हणजे मोबाईल आहे. दिवसभरात जगात काय-काय होतं ते अगदी शुल्लक वेळात आपण जाणून बघू शकतो.आजचे वर्तमानपत्र सुध्दा मोबाईल मध्ये पाहू शकतो.कोरोना काळात मुलांचे अभ्यास सुद्धा मोबाईल मुळेच घेता आले,तर बऱ्याच गुन्हेगारांना मोबाईलच्याच जोरावर पकडल्या गेले आहे.भ्रमणध्वनीचे फायदे किती सांगावेत..! तोटे आहेतच,पण तो त्या उपकरणाचा दोष नव्हे.हे उपकरण वापरणाऱ्या माणसात दोष आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.तेव्हा या दूरसंचाराला शाप म्हणावे की वरदान..? असा प्रश्न अनुत्तरित आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!