Thursday, August 6, 2026
Homeभंडाराआज दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भंडाऱ्यात होणार आगमन..

आज दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भंडाऱ्यात होणार आगमन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज,शनिवार २८ जून रोजी भंडारा शहरात दुपारच्या सुमारास आगमन होणार आहे.दुपारी पावणे एक वाजता हेलिकॉप्टरने त्यांचे हेलिपॅड परिसरातील एमआयईटी कॉलेज, शहापूर येथे आगमन होणार आहे.त्यानंतर ते वाहनाने दुपारी १ वाजता वैनगंगा नदी तिरावरील जल पर्यटन आणि खांब तलाव वरील ५१ फुट उंचीच्या श्रीरामांच्या मूर्तीच्या निर्माण कार्याचा आढावा व नंतर शिवसेना मेळाव्यात उपस्थित राहून पावणे चार वाजता नागपूरकडे प्रयाण करणार आहेत.पक्षातील कार्यकर्त्यांचा मेळावा व जाहीर सभा रेल्वे मैदान येथे होणार असून सदर मेळाव्यास राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत,राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यावेळी उपस्थिती असणार आहेत.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भंडारा विधानसभा क्षेत्रातून शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर विजयी झाले होते. त्यामुळे ज्या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विधानसभा निवडणुकीत विजयी झालेत, अश्या मतदारसंघात जाऊन मतदारांचे आभार मानण्यासाठी शिंदे यांची आभार यात्रा असल्याचे सांगण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाचा हल्ला; पती ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातून एक धक्कादायक घटना आज,गुरुवार ६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.दावेझरी गाव नजीकच्या चुल्हारडोह-आग्री जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी...

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!