- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-अल्पवयीन मुली प्रेमाच्या जाळ्यात सहजपणे अडकून,घरून पळून जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.आई-वडील जीवाचे रान करून लहानाचे मोठे करतात.मात्र,कित्येकांच्या हृदयात
आई-वडिलांच्या प्रेमाला पाझर न फुटता चार दिवसांच्या ओळखीला प्रेमाची परिभाषा देऊन सर्वकाही मानले जात असल्याने घोर कलयुग आलेय,असे म्हणण्याची वेळ आली आहे.नुकतेच गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील एका गावखेड्यातून चामोर्शी शहरात शिक्षणासाठी रोज बसने ये-जा करणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी तीन दिवसांपूर्वी म्हणजेच २५ जून रोजी सकाळी ९ वाजता कॉलेजला जाण्यासाठी घराबाहेर पडली आणि दुपारी शेतात काम करणाऱ्या पित्याला अनोळखी क्रमांकावरून कॉल करून बाबा,मला शोधू नका,मी बाहेरगावी जात आहे,असे म्हणून वडिलांना काही बोलण्याची संधीही न देता मोबाइल बंद केला आणि बेपत्ता झाली.बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने बीए प्रथम वर्षाला चामोर्शीतीलच एका महाविद्यालयात प्रवेश घेतला होता.अश्यातच नागपूरच्या कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी कुणालाही काहीही न सांगता तीन महिन्यांपूर्वी घरून निघून गेली होती.त्यानंतर आता तब्बल तीन महिन्यानंतर एका २५ वर्षीय प्रियकारासह हैदराबादमध्ये सापडली. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने तिला तिथून नागपुरात आणले.१० मार्च रोजी कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १७ वर्षीय मुलगी कुणालाही काहीही न सांगता घरून निघून गेली होती.त्यानुसार कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली,मात्र तिचा कुठेही थांगपत्ता न लागल्याने तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हे शाखेच्या पथकाकडून समांतर तपास सुरू होता.तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांना ती हैदराबाद येथे एका मुलासोबत असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने २५ वर्षीय मुलासह १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला ताब्यात घेत पोलिसांनी मुलीचे समुपदेशन करून तिला कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हवाली केले.सदरची कारवाई पोलिस निरीक्षक ललिता तोडासे,गजेंद्रसिंग ठाकूर,सुनील वाकडे,दीपक बिंदाने,राम निरगुडवार,सचिन श्रीरामे,विलास चिंचुलकर,अभय ढोणे,अश्विनी खोडपेवार,वैशाली किन्हीकर यांच्या पथकाने केली.
- Advertisement -

