Tuesday, July 21, 2026
Homeदेसाईगंजआंबेडकरी समाजाची दिशाभुल करणे आता अशक्य... -वंचित बहुजन आघाडीचे राजरतन मेश्राम

आंबेडकरी समाजाची दिशाभुल करणे आता अशक्य… -वंचित बहुजन आघाडीचे राजरतन मेश्राम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-लोकसभा निवडणुकीत भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी संविधान बदल हा विषय समोर ठेवुन आंबेडकरी समाजाची दिशाभुल केली.पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची १० वर्षाची हुकुमशाहीच्या वाटचालीला लगाम लावण्यासाठी तमाम आंबेडकरी समुदायाने चळवळीची विचारधारा बाजुला ठेवुन कॉंग्रेस प्रणित महाविकास आघाडी ला सरसकट मतदान केले.मात्र,लोकसभा निवडणूक नंतर कॉंग्रेस चा दांभिकपणा समोर आल्याने,आता या समाजाची दिशाभुल करणे अशक्य असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव तथा आरमोरी विधानसभा प्रमुख राजरतन मेश्राम यांनी व्यक्त केले आहे.
लोकसभा निवडणुकीत आंबेडकरी विचारधारेच्या प्रतिनिधिंना लोकसभेत पोहचु द्यायचे नाही; यासाठी भाजप व कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी परस्पर हातमिळवणी करुण आंबेडकरी समुदायाची दिशाभुल करण्याचे कट कारस्थान रचले.भाजपचे राज्यसभा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी संविधान बदलण्याचे वक्तव्य केलेली चित्रफित व्हायरल करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतिय संविधान  पंतप्रधान नरेन्द्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास बदलले जाईल,या भितीमुळे तमाम आंबेडकरी समाजाने चळवळीचा विचार बाजुला ठेवुन सरसकट कॉंग्रेस प्रणित महाविकास आघाडी ला मतदान केले.यामुळे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हुकुमशाही प्रणित धोरणांवर लगाम लावण्यास नक्किच मदत झाली. पण लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस पक्षाचा दांभिकपणा मात्र उघड झाला.बार्टी च्या माध्यमातुन एस सी,एस टी समुहाच्या विद्यार्थ्यांच्या हक्काचा शैक्षणिक निधी कमी करण्यात आला.विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेसने कोणतीही भुमिका बजावली नाही. लगतच असलेल्या कर्णाटक राज्य सरकारने एससी, एसटी विद्यार्थ्यांचा रिजर्व्ह असलेला ३५ हजार कोटी रुपयांचा शैक्षणिक निधी इतरत्र वळती केला. याठिकाणी कॉंग्रेस ची सत्ता आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे १ ऑगस्टला एससी,एसटी समुहाचे वर्गिकरण करुण क्रिमिलेयर ची अट लागु करण्याचा असंवैधानिक निकाल जाहिर केला.त्याची प्रथम अंमलबजावणी कॉंग्रेसची सत्ता असलेल्या तेलंगाना व कर्णाटक सरकारने केली.यावरून कॉंग्रेस पक्ष हा आंबेडकरी समाजासह आदिवासी समाजाची दिशाभुल करत असल्याचे सत्य आता समाज खऱ्या अर्थाने ओळखु लागला आहे.कॉंग्रेस पक्षात राहुन काहितरी साध्य करता येईल,या लालसेने काही आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते समाजाची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करत असले तरी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना संसदेत कधिच पोहचु न देणारा,त्यांना वेळोवेळी त्रास देवुन अपमान करणारा व भारतरत्न या सन्मानापासुन वंचित ठेवणारा कॉंग्रेसचा खरा चेहरा आंबेडकरी समाज ओळखत असुन,यापुढे या समाजाची दिशाभुल करणे अशक्य आहे.वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते ॲड.बाळासाहेब आंबेडकर संपुर्ण महाराष्ट्रात एससी,एसटी व ओबिसी समुहांची मोट बांधणी करीत असुन महाराष्ट्रात येत्या काळात सत्ता परिवर्तन होऊ शकते; आंबेडकरी समाजाने पराभुत मानसिकता बाळगून कॉंग्रेसचे हस्तक असलेल्या लोकांपासुन सावध राहावे; असे आवाहन  राजरतन मेश्राम यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

तब्बल ११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत व दोन नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात...

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी उतरले रत्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-देशातील सध्याचे चित्र काही खरे नाही. अनेकजण आपली जबाबदारी व चूक मान्य करण्यास तयारच नाहीत.तुम्ही काहीही करा,आम्हाला कसलाही फरक पडणार नाही....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!