Thursday, August 27, 2026
Homeचंद्रपूरअवैध रेतीचा उपसा जीवावर बेतला; 'आमच्या गावातून रेती चोरता' म्हणत गावकऱ्यांनी केली...

अवैध रेतीचा उपसा जीवावर बेतला; ‘आमच्या गावातून रेती चोरता’ म्हणत गावकऱ्यांनी केली दगडफेक…-दगडफेकीत एकजण ठार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- राजुरा तालुक्यातील धोपटाळा येथे गावकऱ्यांनी ट्रॅक्टरद्वारे रेतीतस्करी करणाऱ्यांवर हल्ला करून दगडफेक केली.यामध्ये ट्रॅक्टरवरील एक जण ठार तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत.सदरची घटना बुधवारी दि.३ तारखेच्या रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घटना घडली.याप्रकरणी राजुरा पोलिसांनी काल, गुरुवारी सकाळी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.आणखी आरोपींचा शोध सुरू आहे.मोहम्मद शहादत खान वय ५२ वर्षे रा. सोनियानगर,राजूरा असे मृताचे नाव आहे. जखमींमध्ये ट्रॅक्टर मालक देविदास येवले वय ४७ वर्षे व मजूर कैलास कुळसंगे वय ३० वर्षे यांचा समावेश आहे.तर रोशन बावणे वय २८ वर्षे,बंडू कुकर्डे वय ४० वर्षे हे हल्ल्यातून थोडक्यात बचावले.

सविस्तर वृत्त असे की,राजुरा येथून पाच जण ट्रक्टरने सास्तीजवळील धोपटाळा नाल्यावर बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास रेती तस्करीसाठी गेले होते.ही बाब हेरून आधीच गावकऱ्यांनी त्यांना पकडून आणण्याचा बेत आखला होता.ट्रॅक्टर रेती घाटावर पोहचली.यानंतर गावकऱ्यांनी अचानक त्यांच्यावर धावा केला.ट्रॅक्टरमध्ये सुमारे दोन ते तीन घमेले रेती टाकण्यात आली होती.यानंतर गावकऱ्यांनी ट्रॅक्टरसह सर्वांना धोपटाळा येथील चौकात आणले. नंतर ‘आमच्या गावातून रेती चोरता’ असे म्हणत अचानक त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये एक जण छातीवर दगड लागल्याने खाली कोसळला.ट्रॅक्टरमधील इतर दोन जण जखमी झाले होते.जखमी व इतर दोघांनी जमिनीवर कोसळलेल्या मजुराला ट्रॅक्टरमध्ये टाकून राजुरा ग्रामीण रुग्णालयात नेले.डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेने रेती तस्करांमध्ये चांगलीच दहशत पसरल्याचे बोलले जात आहे.पुन्हा एकदा रेती तस्करीचा विषय ऐरणीवर आला आहे.पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करीत आरोपींना अटक करण्यात आली.जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू,स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख महेश कोंडावार,उपविभागीय पोलिस अधिकारी दिपक साखरे,बल्लारपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार आसिफ राजा यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी, उपपोलिस निरीक्षक पांडुरंग हाके,नरेंद्र उरकुडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक निशा भूते व सचिन पडवे यांनी कारवाई केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!