Monday, September 21, 2026
Homeवर्धाअल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गडचिरोली येथील युवकास अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गडचिरोली येथील युवकास अटक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

वर्धा :- अल्पवयीन पीडितेवर बळजबरी अत्याचार केल्याची घटना सेलू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली होती. याप्रकरणी सेलू पोलिसांनी आरोपी नराधमाला गडचिरोली येथून अटक केली.आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.सूरज कांबळे रा.गडचिरोली असे अटक केलेल्याचे नाव आहे. 

१२ वर्षीय अल्पवयीन पीडिता ही घराबाहेर माकडे (वानर) हाकलण्यासाठी निघाली असता सूरजने तिला जवळ बोलावून जबरदस्तीने नजीकच्या शेतात नेत तिच्यावर बळजबरी अत्याचार केला.सूरज गडचिरोली वरून वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात थ्रेशर मशीनवर काम करण्यासाठी आला होता.काम संपल्यानंतर त्याने हे क्रूर कृत्य करून गडचिरोलीला पलायन केले होते.

याप्रकरणी पीडितेच्या जबाबनूसार सेलू पोलिसांनी तक्रार नोंदवून सूरज कांबळेवर गुन्हा दाखल केला.सूरज गडचिरोली येथील रहिवासी असल्याने पोलिसांनी याची माहिती गडचिरोली पोलिसांना दिली होती.दरम्यान गडचिरोली पोलिसांनी त्याला ताब्यात घेत सेलू पोलिसांना माहिती दिली.सेलू पोलिसांचे पथक गडचिरोली येथे येऊन राहूल कांबळे यास अटक केली.न्यायालयाने राहूल यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास सेलू पोलिस करीत आहेत.

(साभार :- साम टिव्ही)

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!