Wednesday, April 15, 2026
Homeदेसाईगंजअन् 'त्याने' संधी साधून चारचाकी वाहनच नेला पळवून... -कोंढाळा येथील वाहन चालकाच्या...

अन् ‘त्याने’ संधी साधून चारचाकी वाहनच नेला पळवून… -कोंढाळा येथील वाहन चालकाच्या चहात टाकले होते गुंगीचे औषध…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-नागपूरला जायचे असल्याचे सांगून बोलेरो बुक करणाऱ्या अज्ञात इसमाने चक्क वाहन चालकाला चहामध्ये गुंगीचे औषध देऊन मोबाइल,रोख रक्कम तसेच बोलेरो वाहन घेऊन पोबारा केल्याची घटना नागपूर येथे उघडकीस आली आहे.या प्रकारामुळे आरमोरी येथील ट्रॅव्हल्स संचालकाला लाखोंचा गंडा घातला गेला आहे.
आरमोरी येथे अनिल सोमनकर यांच्या मालकीची साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाची एजन्सी असून,प्रवासासाठी ते भाड्याने वाहन देत असतात.३ ऑगस्टला एका अनोळखी इसमाने आरमोरी बसस्थानकावरून नागपूरला जाण्यासाठी चारचाकी वाहन भाड्याने हवी असल्याचे सांगितले.सोमनकर यांनी तात्काळ बोलेरो वाहनासह चालक अनिल मोहूर्ले रा.कोंढाळा, ता.देसाईगंज याला संबंधिताला नागपूरला पोहोचवून देण्यास सांगितले.नागपूरला पोहोचल्यानंतर अनोळखी व्यक्तीने एका हॉटेलसमोर वाहन थांबवित चालकाला गुंगीचे औषध टाकलेले चहा पिण्यासाठी दिले.काही वेळातच चालक अनिल मोहूर्ले बेशुद्ध पडल्याची संधी साधत अज्ञात इसमाने त्याला रस्त्याच्या कडेला ठेवून देत मोबाईल,रोख रक्कम तसेच चारचाकी वाहन घेऊन पोबारा केला. बेशुद्धावस्थेत असलेल्या चालकास तब्बल चार तासांनंतर रात्री जाग आली असता वाहन गायब असल्याचे निदर्शनास आले.यासंदर्भात प्रारंभी वाहन मालकाने नागपूर येथे तक्रार केली.मात्र,नागपूर पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्यानंतर आरमोरी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करीत सदर प्रकरण नागपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.पोलिसांद्वारे अज्ञात व्यक्तीसह वाहनाचा शोध घेतला जात आहे.विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वी सोमनकर यांनी १३ लाख रुपये खर्च करून बोलेरो वाहन खरेदी केले होते.मात्र,अज्ञात भामट्याने वाहन पळविल्याने होत्याचे नव्हते झाले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!