Monday, September 21, 2026
Homeचंद्रपूरज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकानेच केला शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग....

ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकानेच केला शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकानेच शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील समाजसेवा विद्यालयात घडली.दरम्यान,विद्यार्थिनीने काल,शुक्रवारी दिलेल्या तक्रारीवरून शिक्षकाविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.रुपेश गुलाब डोर्लीकर वय ४६ रा. वाढोणा असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
आरोपी शिक्षकाने बुधवारी शाळा सुरु असताना विज्ञानाची वही तपासण्यासाठी विद्यार्थिनीला जवळ बोलावून विनयभंग केला.याबाबत विद्यार्थिनीने मुख्याध्यापकांना सांगितले असता त्यांनी पोलिस स्टेशनला तक्रार देण्यास सांगितले.दरम्यान,पीडित मुलीने शुक्रवारी तळोधी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असता पोलिसांनी आरोपी शिक्षकावर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून शिक्षकाला अटक केली.सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अजितसिंग देवरे यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!