Monday, September 21, 2026
Homeगडचिरोलीराष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय अधिवेशन अमृतसर येथे संपन्न.... -...

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय अधिवेशन अमृतसर येथे संपन्न…. – रामदास मसराम यांच्या नेतृत्वात शेकडो ओबीसी बांधव व काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावली हजेरी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय अधिवेशन बुधवारी पंजाबमधील अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठाच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडले.अधिवेशनाला उद्घाटक म्हणून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रतिभा धानोरकर,खासदार डॉ. नामदेव किरसान उपस्थित होते.तर यावेळी माजी मंत्री महादेवराव जानकर,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे,आमदार डॉ.परिणय फुके, आमदार सुधाकर अडबाले,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ.अशोक जीवतोडे,महासचिव सचिन राजूरकर, उपाध्यक्ष किरण पांडव,प्रा.शेषराव येलेकर, हरयाणाचे माजी खासदार राजकुमार सैनी,गुरुनानक देव विद्यापीठ अमृतसचे सिनेट सदस्य सतपाल सिंग सोखी,वन महामंडळाचे माजी अध्यक्ष राजिंदर बिट्टा, आंध्र प्रदेश बीसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष शंकरराव,तेलंगण बीसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष जाजूला श्रीनिवास गौड,गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
ओबीसींच्या मागण्यांच्या अनुषंगाने संसदेत, विधानसभेत,विधानपरिषदेत मुद्दे मांडणार असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.अधिवेशनात ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी यासह ३० मागण्यांचे ठराव मंजूर करण्यात आले.पंजाबमधील दहा टक्क्यांवर आरक्षण वाढविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्यावरही यावेळी चर्चा झाली.’लढा संविधानिक हक्काचा’ या स्मरणिकेचे प्रकाशन प्रसंगी झाले.अशातच गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेकडो ओबीसी बांधवांनी काँग्रेस नेते रामदास मसराम यांच्या नेतृत्वात उपस्थिती दर्शविली होती.यामध्ये ओबीसी कांग्रेस प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे,काँग्रेसचे कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन नाट,आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे,कोरची तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल,देसाईगंज तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले,धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम,ज्ञानदेव पिलारे,नितीन राऊत अरुण कुंभलवार, दिलीप घोडाम,सचिन झिलपे,राजू कुरेशी,पंकज चाहांदे, जावेद शेख,सागर वाढई,जयंत हरडे,तितराम,विजय पिल्लेवान,कैलास वानखेडे,वसीम भाई,नरेंद्र गजपुरे, भूपेश कोलते,दीपक प्रधान तथा शेकडो ओबीसी कार्यकर्ते उपस्थिती होते.राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे यांनी भूमिका मांडली तर प्रास्ताविक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सरचिटणीस सचिन राजूरकर यांनी केले. स्वागतपर भाषण माजी राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांचे नातू इंद्रजित सिंग यांनी केले.संचालन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पंजाबमधील प्रमुख जसपालसिंग खिवा यांनी केले.आभार प्रदर्शन सहसचिव शरद वानखेडे यांनी केले.राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दहावे अधिवेशन ७ ऑगस्ट २०२५ मध्ये गोव्याला होणार असल्याची घोषणा अधिवेशनादरम्यान करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!