Tuesday, July 28, 2026
Homeकुरखेडा२८ वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने खून... - कुरखेडा तालुक्याच्या चिखली येथील घटना..

२८ वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने खून… – कुरखेडा तालुक्याच्या चिखली येथील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा (गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या चिखली येथील २८ वर्षीय तरुणाचा धारदार तीक्ष्ण हत्याराने खून झाल्याची घटना काल,शुक्रवारी ९ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.जितेश भोवनदास पगडवार वय २८ वर्षे रा.चिखली असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,जितेश हा गुरुवारी सायंकाळी घराबाहेर पडला होता.रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा इतरत्र शोध घेतला.शोध घेऊनही त्याचा कुठेही पत्ता लागलेला नव्हता.त्यानंतर काल,शुक्रवारी पहाटे चिखली-वडेगाव मार्गावर स्मशानभूमी परिसरात सिडीवर्कजवळ जितेशचा मृतदेह आढळून आला.शरीरावर तीक्ष्ण हत्याराचे वार व रक्ताने माखलेले कपडे आढळून आल्याने बघ्यांनी एकच गर्दी केली होती.काही नागरिकांनी घटनेबाबत कुरखेडा पोलिस ठाण्याला माहिती दिली.कुरखेडा पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.पुढील तपास कुरखेडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कुरखेडा पोलीस करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!