Thursday, September 3, 2026
Homeचंद्रपूरअन् 'त्याने' चक्क जागृत लंगडा मारुती मंदिराच्या पैश्यावर घातला डल्ला..!

अन् ‘त्याने’ चक्क जागृत लंगडा मारुती मंदिराच्या पैश्यावर घातला डल्ला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-वाढती बेरोजगारी आणि चैनीची जीवनशैली जगणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे झटपट पैश्याच्या नादात अवैध धंद्यांसह चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.अशातच इतर ठिकाणी होणाऱ्या चोऱ्यांसह एका चोरट्याने चक्क जागृत लंगडा मारुती मंदिराच्या पैश्यावर डल्ला  घातल्याचे उघडकीस आले आहे.चोरट्याने दरवाजा तोडून मंदिरातील दानपेटीच उचलून नेली होती व पैसे काढल्यानंतर आरोपीने सदर दानपेटी डोलारा तलावात फेकून दिली होती.पोलीस त्याच्या मागावर होते.अशातच आरोपी हा नुकताच तेलंगाना राज्यात एका चोरीच्या प्रकरणात तेथील कारागृहात शिक्षा भोगत होता.तेथून सुटून आल्यानंतर त्याला भद्रावती पोलिसांनी अटक केली.सदरची घटना भद्रावती शहरातील पंचशील नगर येथील जागृत लंगडा मारुती मंदिरात घडली.चोरी प्रकरणी शुभम विठ्ठल झाडे,वय २९ वर्षे,रा.झाडे प्लॉट,भद्रावती असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.सदरची कारवाई भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलिसांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!