- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-वडील बैल चराईसाठी गेले होते.तर गावात कुणीतरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा सुरू होती.वडील सायंकाळी बैल चराई करून घरी आले असता त्यांचा मुलगा घरी आढळून आला नाही; अशातच गळफास घेतलेल्या घटनास्थळी जाऊन बघितले असता त्यांच्याच मुलाने गावातील एका नाल्याजवळ गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्याने वडिलांनी एकच टाहो फोडला.
चामोर्शी तालुक्यातील चापलवाडा ते मकेपल्ली मार्गावरील नाल्याजवळ एका झाडाला गळफास घेतल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.कुश विजय मडावी वय १८ वर्षे,रा.चापलवाडा असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. कुश हा घोट येथील परमपूज्य महात्मा गांधी हायस्कूलमध्ये १२ वीत शिकत होता.घटनेच्या दिवशी
कुश हा घरी कुणीही नसतांना घरून निघून गेला.त्याने
गळफास घेण्याइतके टोकाचे पाऊल कां उचलले याचा तपास चामोर्शी पोलिसांकडून सुरू आहे.
- Advertisement -

