Thursday, August 6, 2026
Homeभंडाराअन् 'त्याचे जय हिंद,जय भारतच' झाले..! वाघाच्या नखांचे विष होऊ नये...

अन् ‘त्याचे जय हिंद,जय भारतच’ झाले..! वाघाच्या नखांचे विष होऊ नये म्हणून पोटात रेबीजचे १४ इंजेक्शन घ्यावेच लागतील म्हणताच भांडा फुटला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील मोहघाटा गावातील रहिवासी असलेल्या शेतकऱ्याने प्रसिध्दी झोतात येऊन आपल्याला वन विभागाच्या वतीने हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात झालेली भरपाई मिळावी, यासाठी त्याने चक्क वाघाच्या हल्ल्याचा बनाव केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मात्र,वाघाच्या नखांचे विष होऊ नये म्हणून पोटात रेबीजचे १४ इंजेक्शन घ्यावेच लागतील,असे डॉक्टरने म्हणताच शेतकऱ्याने बनाव केलेला भांडाच फुटला अन् ‘जय हिंद जय भारत’ झाले.दुधराम राजीराम मेश्राम वय ४१ वर्षे रा.मोहघाटा,ता.साकोली असे बनाव केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतकऱ्याने जोर लावला,पण हळूच धावला,असल्याने बनविलेल्या बनावाची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.माहितीनुसार,शेतकरी दुधराम मेश्राम याने रविवारी सकाळी मोहफुले वेचण्यासाठी गेलो असता,आपल्यावर वाघाने हल्ला केल्याचा बनाव रचला.बेशुद्ध पडल्यावर शेजारच्या शेतातील शेतकऱ्यांनी घरी आणल्याचे त्याने सांगितले.दरम्यान,तो जखमी झाल्याचे कळल्याने वनरक्षक रामेश्वर भराडे यांनी दुधरामला रुग्णालयात नेले.काही वेळात वनविभागाची चमूही रुग्णालयात पोहोचली. डॉक्टरांना आणि वनविभागाच्या पथकालाही त्याने हीच कहाणी सांगितली.मात्र,त्याच्या पोटावरील जखमा पाहन सर्वांनाच शंका आली.अखेर सत्यता पडताळणीसाठी डॉक्टरांनी आणि अधिकाऱ्यांनी युक्ती केली.वाघाच्या नखांचे विष होऊ नये,म्हणून पोटात रेबीजचे १४ इंजेक्शन घ्यावेच लागतील,असे डॉक्टरांनी सांगितले,ते ऐकताच दुधरामची बीपीच वाढली.मेलो तरी चालेल,पण इंजेक्शन घेणार नाही,असे सांगून त्याने स्पष्ट नकार दिला.दुधराम खोटे बोलत असल्याचे लक्षात आल्याने शहानिशा करण्यासाठी त्याला शेतावरील कथित घटनास्थळी नेले गेले.मोफुल वेचतांना आपल्याला वाघ दिसला,असे त्याने सांगितले.मात्र,त्या मोहाच्या झाडाला फुलेच नव्हती.वाघ नेमका कुठे होता,तो कसा दिसला,किती अंतरावर होता,अशी प्रश्नांची सरबत्ती केल्यावर,आपण बेशुद्ध असल्याने काहीच आठवत नाही,अशी दिशाभूल त्याने केली.वनविभागाच्या चमूने परिसराची पाहणी केली असता,वाघाचे पगमार्क कुठेच आढळून आले नाहीत. अखेर त्याचा खोटेपणा लक्षात आल्यावर त्याला गावात परत आणण्यात आले.मला वाघ दिसला,पण त्याने मला जखमी केले नाही.मी झुडपात पडलो,असा जबाब दुधरामने दिला आहे.तथापि,दुधरामने दाखविलेल्या घटनास्थळी कुठलीही झुडपे आढळलेली नसल्याने केलेली ‘युक्ती अन् शेतकऱ्याची भक्ती’ फोल ठरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाचा हल्ला; पती ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातून एक धक्कादायक घटना आज,गुरुवार ६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.दावेझरी गाव नजीकच्या चुल्हारडोह-आग्री जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी...

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!