- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
लेख :-भारतीय संस्कृतीला जोड नाहीच,भारतीय संस्कृती समृद्ध आणि परंपरांमध्ये नांदणारी हजारो वर्ष पुरातत्वकालीन असून सण-उत्सव हे तिचे जिवंत स्वरूप आहे.श्रद्धा,भक्ती,कृतज्ञता आणि सामाजिक ऐक्य यांचे प्रतीक आहे.मात्र,आज हेच सण-उत्सव ज्या पद्धतीने साजरे केले जात आहेत,त्यात एक विचलनता स्पष्टपणे दिसून येत आहे.अशामुळे धार्मिक वृत्ती कमी होत चालली असून,डीजेचा गोंगाट, नाचगाणी,सेल्फी आणि भपकेबाज सजावट यांची भर पडत आहे.शांतता आणि प्रार्थना या तर जणू हद्दपारच झाल्या आहेत.
पूर्वी सण म्हणजे घराघरातला दिवा,मंत्रोच्चार,एकत्र येणं,कुटुंबातील मोठ्यांकडून संस्कार घेणं आणि एकात्मतेचा अनुभव होय.आज त्याची जागा प्रचंड ध्वनीप्रदूषण,सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणारे कार्यक्रम आणि केवळ ‘दिसण्याच्या’ गोष्टींनी घेतली आहे.
या बदलामुळे काय हरवत आहे?
१.धार्मिक आणि आध्यात्मिक भावनांचा ऱ्हास – भक्ती,मनन,ध्यान आणि देवाशी नातं टिकवणं हे मागे पडलं आहे.
२.पर्यावरणाचा ऱ्हास –फटाक्यांमुळे आणि डीजेच्या आवाजामुळे वायू व ध्वनीप्रदूषण वाढतंय.
३.सामाजिक भान हरवतंय –रुग्ण,वृद्ध,लहान मुलं, विद्यार्थी यांचा विचार न करता केवळ स्वतःचा आनंद महत्त्वाचा ठरतोय.
४.संस्कृतीचं विस्मरण – पुराणकथा,सणामागील विज्ञान,संस्कार,संयम आणि शांतीची शिकवण पुढे पोहोचतच नाही.
पुढील पिढी काय शिकणार?
जर आज आपण सणांना फक्त नाचगाणी,गोंगाट, खर्चिक सजावट आणि मोबाईलवरील रील्सपुरते सीमित ठेवतो,तर उद्या मुलांना सण म्हणजे केवळ ‘एन्जॉयमेंट’ वाटेल.ते सणामागची श्रद्धा,सामाजिक ऐक्य,कुटुंबातील जिव्हाळा आणि निसर्गाशी नातं कधीच शिकणार नाहीत.
आपणच जर त्यांना दाखवलं की सण म्हणजे प्रार्थना, नैवेद्य,वृद्धांचा आशीर्वाद,सांस्कृतिक कार्यक्रम आणि एकत्र येणं तर पुढची पिढी ही परंपरा सन्मानाने पुढे नेईल.
एक दिशा– सजगपणे सण साजरे करूया
सणांचं आधुनिकपण नाकारायचं नाही,पण त्यात भक्ती,सामाजिक भान आणि शांतता यांचा समावेश जरूर करावा.
डीजेच्या ऐवजी भजन किंवा पारंपरिक वाद्यांचा विचार करूया
ढवळाढवळ न करता आरती,कथा,नामस्मरण यांना स्थान देऊया
पर्यावरणपूरक सजावट करूया
वृद्ध,लहान मुलं आणि रुग्णांचा सन्मान ठेवूया
शेवटचा विचार– आपण काय निवडणार?
आजचा सण भविष्यातील संस्कृतीचा बीज आहे.
आपण काय बी पेरतोय,यावर पुढील पिढीची विचारसरणी अवलंबून आहे.
तर विचार करूया –
आपण काय निवडणार? दणदणाट की ध्यान? भपका की भक्ती?
डॉ.श्रीकांत बनसोड,
बनसोड हॉस्पिटल देसाईगंज
9404556774
- Advertisement -

