Saturday, September 5, 2026
Homeभंडाराअखेर शेतकऱ्यास ठार करणारा वाघ जेरबंद...

अखेर शेतकऱ्यास ठार करणारा वाघ जेरबंद…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील खैरी/पट येथील शेतकऱ्यास वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना रविवार ३० मार्च रोजी घडली व ३१ मार्च रोजी सकाळच्या सुमारास सर्वत्र उघडकीस आली होती.खैरी/पट येथील ४० वर्षीय शेतकरी डाकराम गोपीचंद देशमुख हे त्यांच्या मालकी शेत शिवारातील शेतात रविवारी सायंकाळच्या सुमारास मोटार पंपाद्वारे पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते.अशातच दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानकपणे हल्ला करून  ठार केले होते.त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.वाघाने शेतकऱ्याचा बळी घेतल्यानंतर नागरिकांसह परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत वाघाला तत्काळ जेरबंद करण्याची मागणी केली होती.अशातच टी-७५ नामक वाघिणीच्या २ वर्षीय शावकाने शेतकऱ्याचा बळी घेतल्याचे उघडकीस येताच वाघाला पकडण्यासाठी दोन दिवसांपासून वन विभागाचे पथक मागावर होते. त्यासाठी जंगलात गस्त वाढवून १५ ट्रॅप कॅमेरे, एका ड्रोन कॅमेऱ्यामधून निगराणी सुरू केली होती. ४ मचाण उभारून त्यावर ४ शार्प शूटर ठेवण्यात आले होते.आठ ठिकाणी पिंजरेही लावण्यात आले होते. दरम्यान,दोन दिवसांपूर्वी म्हणजेच बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मक्याच्या शेताजवळ लावलेल्या पिंजऱ्यात बांधून ठेवलेली शिकार खाण्यासाठी वाघ आला.हे लक्षात येताच पाळतीवर असलेल्या शार्प शूटरने वाघाला डार्ट दिला.त्यानंतर वाघ जवळपास ५० मीटर अंतरावर जाऊन बेशुद्ध झाला.त्यानंतर वन विभागाच्या पथकाने त्याला पिंजऱ्यात कैद केले.मध्यरात्रीच्या सुमारास केलेल्या या कारवाईनंतर वेळ न दवडता,रात्रीच दोन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पिंजऱ्यात कैद करून वाघाला नागपूर येथील गोरेवाडा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात हलविण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!