- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-शहराच्या बसस्थानकापासून देसाईगंज-कुरखेडा मार्गे अवघ्या दोनशे मीटर अंतरावरील मुख्य डांबरीकरण मार्गावर भला मोठा खड्डा पडल्याने त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचून ‘खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा’ असे झाल्याने मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना कित्तेक दिवसांपासून कमालीचा त्रास सहन करावा लागत होता.सदरच्या खड्ड्याकडे लोकप्रतिनिधी तसेच संबंधित विभाग अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याने खड्ड्यामुळे अपघात होऊन एखाद्याचा जीव गेल्यास जबाबदार कोण?ही बाब देसाईगंज राष्ट्वादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी काल,शुक्रवार दिनांक-३० ऑगस्टला दुपारच्या सुमारास विरोध दर्शवीत मुख्य रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यात बेशरमचे झाड लावले.अशातच ‘देसाईगंज राष्ट्रवादी काँग्रेसने खड्ड्यात बेशरमचे झाड लावून केला निषेध…-मुख्य मार्गावर पडला भला मोठा खड्डा’ अशी बातमी ‘उद्रेक न्युज’ पोर्टल ने प्रकाशित केली होती.त्यानुसार संबंधित विभाग खळबळून जागे झाले व आज,शनिवार दिनांक-३१ ऑगस्टला सकाळच्या सुमारास सदर मार्गावर पडलेल्या खड्ड्याची दुरुस्ती संबंधित विभागाने केली.त्यामुळे देसाईगंज राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार गट)पक्षातील पदाधिकाऱ्यांचे देसाईगंज शहरासह इतर वाहनधारकांनी आभार व्यक्त केले आहे.
- Advertisement -

