- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-एटापल्ली तालुक्याच्या करपनफुंडी येथे गोटा दाम्पत्याची निघृण हत्या करून नदीपात्रात फेकले होते.या प्रकरणात चौकशीसाठी पाच नातेवाईकांना ताब्यात घेण्यात आले होते.मात्र, पोलिसांच्या सखोल तपासात गोटा दाम्पत्याचे तीन पुतणेच त्यांचे मारेकरी असल्याचे उघड झाले.त्या तिघांना एका सहकाऱ्याने मदत केली होती.चारही आरोपींना काल,शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मनोज गोटा वय २८ वर्षे,शंकर गोटा वय २५ वर्षे, देवाजी गोटा वय ३० वर्षे,रामसू नरोटी वय ३० वर्षे सर्व रा.कांदोळी,तालुका एटापल्ली,अशी आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.मनोज,शंकर आणि देवाजी हे गोटा दाम्पत्याचे पुतणे आहेत.तर रामसू हा त्यांचा सहकारी आहे.करपनफुंडी येथील महिला बुर्गो रैनू गोटा वय ५५ वर्षे व रैनू जंगली गोटा वय ६० वर्षे हे दाम्पत्य २४ ऑगस्टपासून घरून बेपत्ता होते.पत्नी बुर्गों गोटा यांचा मृतदेह २७ ऑगस्टला बांडे नदीत आढळला तर रैनू गोटा यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी २८ ऑगस्ट रोजी घटनास्थळापासून ८ किमी अंतरावर नदीत आढळला होता.मृतक रैनू जंगली गोटा हा पुजाऱ्याचेही काम करीत होता.त्यामुळे त्याची हत्या जादूटोण्याच्या संशयातून झाली असावी; असा पोलिसांचा कयास होता; मात्र, तपासानंतर प्रकरणाला वेगळे वळण लागले संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले.मृतक रैनू व बुर्गो यांना ६ मुले व २ मुली आहेत.
- Advertisement -

