Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरअशा शिक्षकांना काय म्हणावे..! वाढदिवसाच्या पार्टीसाठी अल्पवयीन विद्यार्थिनीला बोलावले खोलीवर अन् मागितले...

अशा शिक्षकांना काय म्हणावे..! वाढदिवसाच्या पार्टीसाठी अल्पवयीन विद्यार्थिनीला बोलावले खोलीवर अन् मागितले आलिंगन… – विनयभंग प्रकरणी दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वरोरा(चंद्रपूर):-वाढदिवसाची पार्टी देतो म्हणून दोन शिक्षकांनी अल्पवयीन मुलीला खोलीवर बोलावून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना २६ ऑगस्टच्या सोमवारी वरोरा शहरात उघडकीस आली आहे.याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी विनयभंग व पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोघेही शिक्षक पसार झाले आहेत.या घटनेमुळे गुरू-शिष्यांच्या नात्याला काळिमा फासला गेला आहे. धंनजय रामभाऊ पारखे व प्रमोद बालाजी बेलेकर असे आरोपी शिक्षकांची नावे आहेत.या घटनेविरोधात सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाल्याने शहरात तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे.प्रमोद बेलेकर व धनंजय पारके हे दोघेही शहातील नामांकित विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.दोघांनी वाढदिवसानिमित्त पार्टीचा बेत आखला व त्याच विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीला बेलेकर यांनी आपल्या घरी बोलविले.वाढदिवस साजरा केल्यानंतर शिक्षकाने विद्यार्थिनीला चॉकलेट भेट म्हणून दिले.लगेच गुरुजींनी रिटर्न गिफ्ट मागितले.रिटर्न गिफ्टमध्ये आलिंगन(मिठी)मारण्याचा प्रस्ताव विद्यार्थिनी पुढे ठेवण्यात आला.विद्यार्थिनी ते नाकारले तेव्हा गुरुजींनी हात पकडून जबरदस्ती मिठी देण्याचा प्रयत्न केला.धास्तावलेल्या विद्यार्थिनीने घरचा रस्ता पकडला.हा सगळा प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला.यासाठी कुणाकडे दाद मागावी; या विवंचनेत असलेल्या पालकांनी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने पोलिस स्टेशन गाठत दोन्ही शिक्षकांविरुद्ध तक्रार नोंदविली.पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपीविरुद्ध पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!