Monday, August 31, 2026
Homeनागपूरइथे गुन्हेगाराला थारा नाहीच...! 'त्या' पत्रकाराला दोन दिवसांची पोलीस कोठडी...

इथे गुन्हेगाराला थारा नाहीच…! ‘त्या’ पत्रकाराला दोन दिवसांची पोलीस कोठडी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :- न्यायाच्या समोर कुठल्याही गुन्हेगाराला थारा नाही.गुन्हा कुठलाही असो,शेवटी गुन्हा हा गुन्हाच असतो.यात खंडणी वसूल करणे,धमक्या देणे,विनयभंग, अश्लील चाळे,अत्याचार,मारझोड,हत्या व इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.असाच प्रकार नागपूर शहरात समाजाभिमुख कार्य करणाऱ्या पत्रकाराच्या बाबतीत उघडकीस आला आहे.आरटीओ दलालाची बदनामी करण्याची धमकी देऊन पैसे उकळणाऱ्या दैनिक भास्करचा शहर संपादक सुनील हजारी याच्याशी संबंधित लोकांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.हजारीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.२९ ऑगस्ट रोजी दुपारी सदर पोलिसांनी सुनील हजारीला आरटीओ एजंट धनराज उर्फ टिटू शर्मा यांच्याकडून ८० हजार रुपयांची खंडणी घेताना रंगेहात पकडले होते.बातमी प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन हजारी पैसे उकळत होता.शर्मा यांच्याकडे त्याने १० लाख रुपये मागितले होते. सुरुवातीला सात लाख रुपये आणि नंतर तीन लाख रुपये देण्यास सांगितले.एक लाखाचा पहिला हप्ता २८ ऑगस्ट रोजी मेडिकल चौकात घेण्यात आला.एक लाखाचा दुसरा हप्ता २९ ऑगस्टला देण्याचा निर्णय झाला. दरम्यान,हजारीला व्हीसीए चौकातील आइस्क्रीम पार्लरमध्ये ८० हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून हजारीला अटक केली. सदर पोलिसांनी त्याला आज न्यायालयात हजर केले.पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की,हजारी व्यतिरिक्त इतर पत्रकार,वरिष्ठ संपादक आणि त्यांच्यासोबत काम करणारे बदनामीची भीती दाखवत, वेगवेगळ्या विभागांत नियुक्त केलेल्या लोकांकडून पैसे उकळत असल्याचे आढळून आले आहे.या संदर्भात हजारीची चौकशी करावी लागेल. हजारीच्या खंडणीच्या कृत्यात इतर लोकांचीही मदत असण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यात आली आहे; त्यांचाही शोध घ्यावा लागेल. पोलिस कोठडी नसताना हजारी साक्षीदारांवर प्रभाव टाकून पुरावे नष्ट करू शकतो.त्यामुळे त्याची कोठडी आवश्यक आहे. हजारीने २८ ऑगस्ट रोजी शर्मा यांच्याकडून एक लाख रुपये घेतले होते.याबाबत त्याने समाधानकारक उत्तर दिलेले नाही.उलट तपासणीनंतर न्यायालयाने हजारीला १ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!