Thursday, June 4, 2026
Homeदेसाईगंजअखेर कुरुड येथील तरुणाच्या खुनाचा देसाईगंज पोलिसांनी लावला छडा…- गावातील शंकर पटाच्या...

अखेर कुरुड येथील तरुणाच्या खुनाचा देसाईगंज पोलिसांनी लावला छडा…- गावातील शंकर पटाच्या दुसऱ्या दिवशीची घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(गडचिरोली) :-देसाईगंज तालुक्याच्या कुरुड गावामध्ये दिनांक-८ फेब्रुवारी २०२४ रोजी शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते.त्यानुसार गावामध्ये विविध नाटकांचे आयोजन गावातील मंडळातर्फे करण्यात आले होते. दिवसा शंकर पट व रात्रौ नाटकांचे प्रयोग असल्याने सर्वच जण आपापल्या धुंदीत होते.त्यानुसार अंधाराचा फायदा घेत प्रतीक घोडेस्वार याच्यावर अज्ञात व्यक्तींनी प्रहार करून ठार केले.प्रतीक विनय घोडेस्वार वय २८ वर्षे हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत गावातील शंकर पटाच्या दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास घरा नजिक आढळून आला.त्यानुसार देसाईगंज पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.वैद्यकीय अहवालानंतर २८ फेब्रुवारीला पोलीस उपनिरीक्षक संजय गोंगले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.दरम्यान,प्रतीकचा खून झाला तेव्हा अंधार होता,शिवाय सीसीटीव्ही नव्हते, शंकर पटामुळे गावात गर्दी होती.त्यामुळे मारेकरी शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते.अखेर प्रतीक बद्दल पोलिसांनी सखोल माहिती जाणून घेतली असता; त्याचे गावातील विकास जनार्दन बोरकर वय ५० वर्षे याच्याशी नेहमी भांडण होत असे,त्याआधारे पोलिसांनी विकासकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र,पोलीस खाक्या दाखविताच तो वठणीवर आला व त्याने खुनाची कबुली दिली.दरम्यान, देसाईगंज पो.नि.अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर यांनी काल,दिनांक- ६ मार्चला विकास बोरकरला अटक केली.

असा केला खून👇

नाटकाच्या तिकीट काउंटरवर ९ फेब्रुवारीला पहाटे प्रदीप घोडेस्वार व विकास बोरकर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.यावेळी प्रतीक मद्यधुंद स्थितीत होता, ते रहायला एकाच गल्लीत आहेत.भांडणानंतर दोघेही आपापल्या घराकडे गेले. घराजवळ पोहोचल्यावर दोघांत पुन्हा वाद झाला. यावेळी अंधारात विकासने प्रदीपच्या डोक्यात कवेलू मारला.डोक्यात घाव वर्मी बसल्याने तो कोसळला व रक्तस्राव होऊन मृत्युमुखी पडला.यानंतर विकास गुपचूप घरी गेला व झोपी गेला.यापूर्वीही त्यांच्यात अनेकदा वाद झाला होता.घराकडे का पाहतो,असे म्हणून विकासने घटनेपूर्वी काही दिवस आधीच प्रदीप याच्याशी वाद घातला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहरम उत्सव तसेच माओवादी संघटनेच्या टी.सी.ओ.सी.(TCOC)कालावधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७...

भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र भीषण अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.आपण आपल्या साईडने जात असो वा कितीही नियंत्रित वाहन...

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!