Tuesday, July 21, 2026
Homeभंडाराअंगणात खेळत असतांना भरधाव वाहनाची धडक; दीड वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू..

अंगणात खेळत असतांना भरधाव वाहनाची धडक; दीड वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-अंगणात खेळत असतांना अज्ञात चारचाकी वाहनाने एका दीड वर्षीय चिमुकल्यास जोरदार धडक दिल्याने चिमुकला दूरवर फेकला जाऊन जागीच गतप्राण झाला असल्याची घटना आज,रविवारी १६ मार्चला दुपारच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यापासून ७ किलोमिटर अंतरावर असलेल्या साकारला येथे घडली.दुर्वांश डोये असे अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,दुर्वांश याची आई काम करीत असतांना तिच्या बाजूलाच मुलगा खेळत होता.दुर्वाश हा अंगणात खेळत असतांना आंधळगावच्या दिशेने जात असलेल्या भरधाव चारचाकी वाहनाने दीड वर्षीय चिमुकल्याला जोरदार धडक दिली.यात दुर्वांश हा फुटबॉलसारखा दूरवर फेकला गेला.गाडीच्या धडकेत दूरवर फेकला गेल्याने चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान अचानक घडलेल्या या घटनेने दुर्वाश याच्या आईला जबर धक्का बसला असून चिमुकल्याच्या मृत्यू झाल्याने आईने एकच टाहो फोडला.दरम्यान अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला.चिमुकल्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून गाडी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकरणी घटनेचा पुढील तपास आंधळगाव पोलीस करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!