Wednesday, April 29, 2026
Homeभंडारारेतीच्या भरधाव टिप्परने दुचाकीस्वाराला चिरडले..

रेतीच्या भरधाव टिप्परने दुचाकीस्वाराला चिरडले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-दुचाकीत इंधन भरून शहराच्या धावत्या दिशेने मुख्यमार्गाला लागलेल्या दुचाकीस्वाराला रेतीच्या भरधाव टिप्परने चिरडले असल्याची घटना काल,मंगळवारी १५ ऑक्टोंबरला सकाळच्या सुमारास तुमसर शहरातील कारेमोरे पेट्रोल पंपसमोर घडली. मेंदूला जबर मार लागल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला.प्यारेलाल कुमावत वय ३२ वर्षे,रा.शिक्कार, राजस्थान असे अपघातातील मृताचे नाव आहे.
अपघात घडताच घटनास्थळी एकच गर्दी जमली. मॉर्निंग वॉकला जाणारे,सकाळच्या शिकवणी वर्गाचा प्रवास करणारे विद्यार्थी सदर अपघाताचे प्रत्यक्षदर्शी ठरले.मृत प्यारेलाल कुमावत एमएच ३६/एम ६९८६ क्रमांकाच्या दुचाकीने इंधन भरून भंडाराच्या दिशेने जाण्याकरिता जेमतेम मुख्यमार्गाला लागला होता. त्याच दिशेने निघालेल्या एम एच ३७ / एफ ३२६५ क्रमांकाच्या टिप्परने मृताच्या गाडीला मागेहून जबर धडक दिली.त्यात दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. गाडीच्या खाली येऊन प्यारेलाल जागीच दगावला. घटना घडताच टिप्पर चालकाने घटना स्थळावरून पळ काढला.घटनेची माहिती तुमसर पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना केले.जड वाहन व चालकाला ताब्यात घेऊन तुमसर पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यंदाही होणार बौद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात वन्यप्राण्यांची गणना..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बौद्ध पौर्णिमेच्या रात्री देशातील सर्व अभयारण्यातील वन्यजीवांची गणना केली जाते. त्यासाठी अभयारण्याच्या परिसरात वनविभागातर्फे मचाण उभारल्या जातात.त्यावर बसून वनविभागाचे कर्मचारी सर्व...

तीनजण नदीत बुडाले; वडील मुलगी आणि भाची..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या बाप- लेकीचा तसेच भाचीचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज, मंगळवार २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या...

सेवा हक्क दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना नागरिकांना पारदर्शक,वेळेत व सुलभ सेवा देण्याची शपथ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सेवा हक्क दिनानिमित्त आज,मंगळवार २८ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत नागरिकांना पारदर्शक,वेळेत...

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ बागेश्वर बाबाला चपलेचा प्रसाद.. – आरमोरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कमिटी आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नुकतेच धिरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम बाबाने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज,मंगळवार २८ एप्रिल रोजी आरमोरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!