Sunday, September 13, 2026
Homeनागपूरअखेर आंघोळीसाठी नहरावर गेलेल्या चार शाळकरी विद्यार्थ्यांचे सापडले मृतदेह...

अखेर आंघोळीसाठी नहरावर गेलेल्या चार शाळकरी विद्यार्थ्यांचे सापडले मृतदेह…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-पोहण्यासाठी वसतिगृहात राहणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी घोटीटोक (बोरी),ता.रामटेक,जि.नागपूर शिवारातील पेंच जलाशयाच्या डाव्या कालव्यात सोमवारी १४ ऑक्टोंबरच्या सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास उड्या घेतल्या आणि चौघेही पाण्याच्या प्रवाहात आल्याने वाहत गेले त्या चौघांचाही बुडून मृत्यू झाला असून,त्यांचे मृतदेह काल,मंगळवारी सकाळच्या  सुमारास तीन वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले.
मृतांमध्ये मनदीप अविनाश पाटील वय १७ वर्षे,अनंत योगेश सांबारे वय १३ वर्षे,मयंक कुणाल मेश्राम वय १४ वर्षे व मयूर खुशाल बांगर वय १५ वर्षे सर्व रा. नागपूर या चौघांचा समावेश असून,ते घोटीटोक (बोरी) येथील इंदिरा गांधी वसतिगृहात राहायचे आणि शिक्षण घ्यायचे. आठपैकी पाच विद्यार्थी या कालव्यात पोहण्यासाठी उतरले होते.यातील कमलेश बाळू देऊलकर वय १४ वर्षे,रा.नेरला,ता.मौदा याने पोहत काठ गाठल्याने तो थोडक्यात बचावला.उर्वरित चौघे वाहत गेले.पोलिस व महसूल विभागाने लगेच त्यांची शोध मोहीम सुरू केली. सायंकाळपर्यंत त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नव्हता. अंधारामुळे थांबविलेली शोध मोहीम मंगळवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आली. एसडीआरएफच्या जवानांसोबत स्थानिक मच्छीमारांचीही मदत घेण्यात आली होती.उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन,उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते,तहसीलदार रमेश कोळपे, ठाणेदार आसाराम शेटे यांच्या मार्गदर्शनात शोध कार्य पार पडले.रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टम आटोपल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.प्रियंका योगेश सांबारे यांच्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी वसतिगृह अधीक्षक धनराज महादुले, चौकीदार कैलास वाळवे व चपराशी प्रशांत पाटील यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६ (१), अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ चे सहकलम ७५,८२ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सर्व जण एकाच वसतिगृहात राहात असले तरी वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकायचे.अनंत सांबारे हा महादुला,ता.रामटेक येथील संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर हायस्कूलमध्ये,मनदीप पाटील हा रामटेकातील नरेंद्र तिडके महाविद्यालयात तर मयंक मेश्राम व मयूर बांगर हे दोघे घोटीटोक येथील इंदिरा गांधी विद्या मंदिर हायस्कूलमध्ये शिकायचे.वसतिगृहात विद्यार्थ्यांना मारहाण करीत त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला जात असून,त्यांना शिळे अन्न खायला दिले जात असल्याची तक्रार प्रियंका सांबारे यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक शिक्षा पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही-सर्वोच्च न्यायालय -शिक्षकावरील संपूर्ण खटला रद्द..

उद्रेक न्युज वृत्त :-शाळेत शिक्षकाने दोन विद्यार्थिनींना दिलेल्या शिक्षेवरून शिक्षकाविरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हेगारी खटला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे रद्द करून शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक...

आपसी समझोत्याने ४६१ प्रकरणे निकाली; तब्बल ४ कोटी १६ लाखांहून अधिकच्या रकमेवर तडजोड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार १२...

कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील यादी गावपातळीवर प्रसिद्ध.. – गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंत ४ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या खात्यात २५ कोटी रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’च्या दुसऱ्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील ३ हजार ६१० शेतकरी पात्र ठरले आहेत.पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा...

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!