Monday, April 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनिवडणूक आचारसंहिता म्हणजे नेमकी काय? - आचारसंहिता कधीपासून लागू होते आणि...

निवडणूक आचारसंहिता म्हणजे नेमकी काय? – आचारसंहिता कधीपासून लागू होते आणि किती दिवस लागू राहते?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुख्य निवडणूक आयोगाने आज मंगळवारी पत्र परिषद घेत महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली. त्यानुसार राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मत मोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.अशातच अनेकांच्या मनात आचारसंहिता केव्हा लागू होते व किती दिवस आचारसंहिता असते.असे प्रश्न अनेकांच्या मनात घर करुन सोडत असतात.तर या बाबतची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.
देशात दर पाच वर्षांनी लोकसभा,विधानसभेच्या निवडणुका होतात.वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या वेळी होतात.निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच आचारसंहिता लागू होते.निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचारसंहितेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते.निवडणुकीची तारीख जाहीर होताच  आचारसंहिता लागू होते आणि ती मतमोजणी होईपर्यंत सुरू राहते.निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी पैसा कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीच्या फायद्यासाठी वापरता येत नाही.याशिवाय निवडणूक प्रचारात सरकारी वाहने, बंगले,विमान किंवा सरकारी सुविधांचा वापर करता येत नाही.आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणतीही सरकारी घोषणा,पायाभरणी किंवा उद्घाटन होत नाही. याशिवाय,कोणतीही रॅली किंवा जाहीर सभा घेण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. निवडणूक रॅलींमध्ये पैसा,धर्म,जात यांच्या नावावर मते मागणे पूर्णपणे निषिद्ध आहे.निवडणुकीशी कोणत्याही प्रकारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत.त्यासाठी गरज भासल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते.एखाद्या उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाते.आचारसंहितेचे नियम मोडणाऱ्या संबंधित उमेदवाला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते.उमेदवाराने अथवा राजकीय पक्षाने नियम मोडल्यास गंभीर गोष्ट असेल तर त्या पक्षावर किंवा उमेदवारावर कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो.इतकेच नव्हे तर संबंधिताला कारावासाच्या शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

३० वर्षीय महिलेची दिराने धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात आज,सोमवार २७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास एक भयावह आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली.नात्यातील दिरासोबत विवाह समारंभासाठी...

शासन निर्णयात जरी पोपट पक्षीचा उल्लेख नसेल; तरीही एखाद्याला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवता येणार नाही.. – आता पोपट पक्षांनी नुकसान केल्यास मिळणार भरपाई..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकऱ्याने शेतात डाळिंबाची झाडे लावली.पण,अर्ध्याहून अधिकच्या झाडांची फळे ही पोपट पक्षांनी खाऊन नष्ट केली होती.अश्यातच शेतकऱ्याने कृषी विभागास माहिती देऊन पंचनामा...

रखरखत्या उन्हात लग्नसमारंभासाठी प्रवास; बसमध्येच सोडला प्राण.. – आज उष्णतेच्या लाटेचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या स्थितीत नागपूरसह विदर्भाचे तापमान वाढतच आहे.एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली असून अंगाची लाहीलाही होत आहे.एप्रिल महिन्यातच ही स्थिती आहे,तर...

असे कोण करते सांगा? ग्रामसेविकेने शासकीय निधी सरकारी कामासाठी न वापरता चक्क व्याजाने दिले वाटून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासन स्तरावरून गावगाड्याचा सर्वांगीण विकास व्हावा,यासाठी वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणावर निधीचे वाटप करण्यात येते.मात्र,काही लोकसेवक मनमर्जिने कामे करून घरचीच...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!