Saturday, June 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्ततब्बल ६ लाख ४० हजार रुपयांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात.. -...

तब्बल ६ लाख ४० हजार रुपयांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात.. – तहसीलदाराच्या घरीच सापळा कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-रेतीघाट सुरू तर होतात,मात्र काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने अवैध वाळू उपश्याचा खेळ सुरू होऊन पर्यावरणाची ऐशीतैशी केली जात आहे.त्यांना कुणाशी काहीही देणे-घेणे नसते.बेसुमार उपश्यामुळे तिकडे शेतकऱ्यांच्या विहिरी तळाला लागोत वा नळ योजनेचा पाणीपुरवठा प्रभावित होऊन गेला तरी चालेल.अश्यांना केवळ छपाई केंद्र कुठून होतो,याचेच भान असते.लाखो रुपयांचा महिन्याकाठी मिळणारा पगारही विविध विभागातील अधिकाऱ्यांना कमीच पडतो आहे.अश्याच प्रकारे एका सुटबुटवाल्या तहसीलदाराला पैश्याची हाव सुटल्याने त्याने चक्क अवैध वाळू उपसा सुरू ठेवण्यासाठी तब्बल सात लाख रुपयांची लाच मागणी करून तडजोडीअंती ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारतांना एसीबीच्या जाळ्यात अडकल्याची घटना आज, शनिवार ६ जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.सदरची सापळा कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी)छत्रपती संभाजीनगर येथील कासलीवाल मारव्हल सोसायटी,रो हाऊस नंबर ११९ येथे वास्तव्यास असणाऱ्या जालना जिल्ह्याच्या अंबड तहसील कार्यालयाचा तहसीलदार विजय चव्हाण याच्या घराच्या मुख्य गेटवरच कारवाई करण्यात आली.प्रकरणातील तक्रारदार यांच्याकडे सहा हायवा गाड्या असून ते जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस ठाण्याच्या परिसरातून अधिकृत व अनधिकृत वाळू उपसा तसेच वाहतुकीचा व्यवसाय करतात.या गाड्यांवर कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्यासाठी तहसीलदार विजय चव्हाण याने महिण्याला तब्बल सात लाख रुपयांची मागणी केली होती.याबाबत चव्हाण याने २६ मे २०२६ रोजी सौदा केला होता; मात्र नेमक्या त्याच काळात अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे अमरण उपोषण सुरू झाल्याने यात खंड पडला.दरम्यान,पैश्याची मोठी हाव सुटल्याने गेल्या दोन दिवसांपासून त्याने तक्रारदाराकडे पैशांसाठी तगादा लावला.परत तहसीलदार चव्हाण याने आज शनिवारी लाचेच्या रकमेची मागणी करत तक्रारदाराला थेट छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या घरी पैसे घेऊन बोलावले.त्यानुसार,तक्रारदार लाखोंची रक्कम आणि बीड एसीबीच्या पथकासह छत्रपती संभाजीनगरला पोहोचले.येथे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तो आपल्या सोसायटीच्या मुख्य गेटबाहेर आला आणि तक्रारदाराने त्याच्या हातात ६ लाख ४० हजार रुपयांची लाचेची बॅग सुपूर्द करताच,बीडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून लाखो रुपयांचा पगार घेणाऱ्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा वरच्या कमाईशिवाय पोटच भरत नाही वाटते.लाचप्रकरणी लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण याचेवर छत्रपती संभाजीनगरच्या सातारा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरखेडाच्या गुरनोली ग्रामपंचायतीला राज्याच्या मुख्य सचिवांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत शंभर टक्के पोहोचविण्यासाठी प्रशासनाने केवळ नियमांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा न राहता विकासाभिमुख दृष्टीकोन स्वीकारणे आवश्यक...

पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करावी.. – अटकेच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा आणि मानवाधिकारांचे उल्लंघन करता येणार नाही- उच्च न्यायालय

उद्रेक न्युज वृत्त :-काही प्रकरणांमध्ये पोलीस कारवाईच्या नावाखाली कायदेशीर मर्यादा ओलंडतांना दिसून येतात.स्वतःची बढाई वा आम्ही किती कठोर कारवाई करतो,यासाठी एखाद्या गुन्हेगाराची धिंड काढून...

३१ वर्षीय तरुण वाघाच्या हल्ल्यात ठार..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यात एका ३१ वर्षीय तरुणावर वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे.दुलेश्वर संतोष खरकाडे वय ३१ वर्षे,रा.कलपाथरी,ता.गोरेगाव,जि.गोंदिया असे...

अखेर विमानतळ भूसंपादन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती.. – शेतकऱ्यांना लेखी आश्वासन; मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर होणार अंतिम निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रस्तावित गडचिरोली विमानतळासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात जिल्हा मुख्यालय परिसरात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल घेत राज्याचे राज्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!