Sunday, September 13, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तविदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५ जून २०२६ पासून सुरू होणाऱ्या शाळा आता विदर्भात २२ जून २०२६ पासून सुरू होणार आहेत.वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.विदर्भातील तापमान सतत ४२ अंश सेल्सिअस ते ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असल्याने शिक्षक आणि पालक संघटनांनी शाळा २६ जूनपर्यंत पुढे ढकलण्याची मागणी केली होती.या मागणीवर सरकारकडून तातडीने निर्णय न झाल्याने काही संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.या याचिकेवर सुनावणी होण्यापूर्वीच सरकारने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शाळा उशिरा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला.त्यानुसार,२२ जून ते ३० जून या कालावधीत विदर्भातील सर्व शाळा केवळ सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार आहेत.दुपारच्या कडक उन्हापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे,यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानंतर १ जुलै २०२६ पासून शाळांचे कामकाज नियमित वेळेनुसार सुरू होईल.विदर्भ वगळता राज्यातील उर्वरित सर्व विभागांमधील शाळा १५ जूनपासून पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सुरू होणार आहेत.सदरचा निर्णय केवळ विदर्भातील हवामान परिस्थिती लक्षात घेऊन घेण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे व धोरणात्मक बदल जारी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वाळू आणि वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी नवीन मार्गदर्शक...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ या लोकनाट्यास सातारा येथील पुरस्कार जाहीर.. -यंदाचा सहावा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट,डाकेवाडी(जि. सातारा)या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना स्पंदनच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट...

शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक शिक्षा पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही-सर्वोच्च न्यायालय -शिक्षकावरील संपूर्ण खटला रद्द..

उद्रेक न्युज वृत्त :-शाळेत शिक्षकाने दोन विद्यार्थिनींना दिलेल्या शिक्षेवरून शिक्षकाविरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हेगारी खटला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे रद्द करून शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक...

आपसी समझोत्याने ४६१ प्रकरणे निकाली; तब्बल ४ कोटी १६ लाखांहून अधिकच्या रकमेवर तडजोड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!