Wednesday, September 2, 2026
Homeचंद्रपूरचक्क घरात शिरून बिबट्याने महिलेवर चढविला हल्ला...

चक्क घरात शिरून बिबट्याने महिलेवर चढविला हल्ला…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-आतापर्यंत जंगलात गुरे चारण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर वाघाने हल्ला केल्याच्या घटना घडत होत्या.मात्र,आता चक्क घरात शिरून बिबट्याने महिलेस जखमी केले असल्याची घटना
मूल तालुक्यातील मौजा शिवापूर चक येथे काल शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.झोपेत असलेल्या महिलेवर बिबट्याने चक्क घरात शिरून हल्ला केल्याने परिसरात खळबळ माजली आहे.वंदना परशुराम निमगडे वय ४८,रा. शिवापूर चक,असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.मूल तालुक्यातील मौजा- शिवापूर चक येथे परशुराम आबाजी निमगडे आपल्या कुटुंबीयासह राहतात.घराला लागूनच बगिचा तसेच काही अंतरावर बफर क्षेत्राचे जंगल आहे.निमगडे यांचे कुटुंबीय रात्री झोपेत असताना शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास बिबट्याने घरात शिरून वंदना परशुराम निमगडेवर हल्ला केला.काही अंतरावर
असलेल्या कुत्र्यांनी बिबट्याला बघून भुंकण्याचा आवाज केल्याने निमगडे कुटुंबीय जागे झाले.दरम्यान,
बिबटया वंदनावर हल्ला करीत असल्याचे दृश्य बघुन इतरांनी घाबरलेल्या अवस्थेत आरडाओरड केल्याने बिबट पळुन गेला.मात्र,बिबट्याच्या हल्यात वंदना निमगडे ही जखमी झाली.घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन जखमी वंदना निमगडे हिला मूल येथील उपजिल्हा रूग्णलयात उपचारार्थ दाखल केले.वनविभागाने पंचनामा करून पुढील तपास करीत आहेत.
मुल तालुका हा बल्लारपूर मतदार संघात येतो.या क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री असल्याने चक्क वनमंत्र्याच्या गृहक्षेत्रातच वन्यप्राण्यांची एवढी दहशत निर्माण झाल्याने तालुक्यातील नागरिकांनी कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न निर्माण झालेला आहे.वनमंत्र्यांनी विधानसभा क्षेत्रातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यावर तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!