Monday, July 13, 2026
Homeआरमोरीअन् संतप्त आंदोलनकर्त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामसेविकेच्या खुर्चीला घातला हार.. -आरमोरी तालुक्यातील घटना...

अन् संतप्त आंदोलनकर्त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामसेविकेच्या खुर्चीला घातला हार.. -आरमोरी तालुक्यातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

आरमोरी(गडचिरोली):-सोनपूर येथील पेसा समिती व गावकऱ्यांच्या वतीने गेल्या सात-आठ महिन्यांपासून सतत ग्रामपंचायत प्रशासन व वरिष्ठ कार्यालयांना सोनपूर येथील आबादी जागेवरील अतिक्रमण हटविणे व अन्य काही मुद्यांना घेऊन निवेदने देत मागण्यांची पूर्तता करण्यासाठी विनंती करण्यात आली होती. सदरच्या मागण्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या अखत्यारीत येत असल्याने मागण्यांवर ग्रामपंचायत प्रशासनाने तोडगा काढावा म्हणून पेसा समिती पदाधिकारी व सोनपूर येथील गावकरी हे आक्रमक झाले होते.त्यांनी ६ जून २०२४ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन केले.या आंदोलनादरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी हमीपत्र देऊन मागण्या पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु,चार महिण्यांचा कालावधी लोटूनही एकही मागणी पूर्ण झाली नाही.त्यामुळे २० सप्टेंबर २०२४ पासून पुन्हा कोजबी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत साखळी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.सदरच्या आंदोलनाला आठ दिवसांचा कालावधी लोटूनही ग्रामपंचायत प्रशासनाने दखल न घेतल्याने शेवटी आंदोलनकर्ते संतप्त झाले आहेत.यातूनच त्यांनी सरपंच,ग्रामसेविका व उपसरपंचाच्या खुर्च्याना चपला,जोड्यांचा हार घालून निषेध व्यक्त केला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!