- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-बिबट्याने थेट धावत्या दुचाकीस्वारांवर हल्ला केल्याने तिघे गंभीर जखमी झाले असल्याची खळबळजनक घटना बल्लारपूर तालुक्यातील कोठारी-देवई येथे काल,मंगळवारी २४ सप्टेंबरला सकाळच्या सुमारास वनविकास महामंडळाच्या झरण वनक्षेत्रातील कक्ष क्र.१०४ मध्ये घडली.साईनाथ भोयर,विजय साखरकर, देवानंद कुमरे तिघेही रा.कोठारी अशी जखमींची नावे आहेत.तिघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
कोठारी येथील साईनाथ भोयर,विजय साखरकर, देवानंद कुमरे हे तिघे पेंटिंगच्या कामासाठी एकाच दुचाकीवरून देवईकडे जात होते.कोठारी-देवई घनदाट जंगल असून,वन्यप्राण्यांचा रहदारीचा मार्ग आहे.सकाळी बिबट्या रस्ता ओलांडण्यासाठी कडेला आला होता.दरम्यान,त्याच्यासमोर अचानक दुचाकी आल्याने त्याने थेट दुचाकीवरच झेप घेतली.अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेल्या दुचाकीस्वारांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने जंगलात धूम ठोकली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही; मात्र, बिबट्याने तिघांच्याही हात,पाय व मानेला ओरबाडून गंभीर जखमी केले.या घटनेची माहिती मिळताच झरण वनपरिक्षेत्रातील अधिकारी एस.डी.मडावी हे ताफ्यासह घटनास्थळावर तात्काळ पोहोचले व जखमींना शासकीय वाहनाने कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांनाही शासकीय मदत देण्याची मागणी केली जात आहे.
- Advertisement -

