उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मांगली येथे शेतात काम करीत असतांना विज अंगावर पडून महिलेचा मृत्यू झाला.तर तीन महिला जखमी झाल्या आहेत.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हि घटना आज,शुक्रवारी दि.१९ जुलै सांयकाळी पाच वाजता घडली.अंतकला नेवारे वय ५० वर्षे असे मृत महिलेचे नाव आहे.
शेतात रोवणी करीत असताना अचानक वीज पडल्याने अंतकला यांचा मृत्यू झाला.यांच्यासोबतच शेतात काम करत असणाऱ्या महीलांजवळच वीज पडल्याने तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. निला कारंडे,विजया शरणागत,शशिकला शरणागत अशी जखमी महिलांची नावे आहेत.
जिल्ह्यात पावसाने जोर पकडल्याने धानाच्या रोवणीला गती आली आहे.सगळीकडे रोवणीसाठी महिला मजुरांकडून रोवणीची कामे केली जात आहेत. आज सकाळपासून मांगली येथील शेतशिवारात रोवणी सुरू असताना संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक मजुरांवर वीज कोसळली.यात अंतकला यांचा जागीच मृत्यू झाला.तर अन्य तीन महिला जखमी झाल्या.हवामान विभागाने जिल्ह्यात रेड अलर्ट दिला असून नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

