Saturday, April 18, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथे 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' मदत केंद्राचे उद्घाटन…-मोफत अर्ज वितरण व...

कोंढाळा येथे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ मदत केंद्राचे उद्घाटन…-मोफत अर्ज वितरण व मोफत ऑनलाईन अर्ज देण्यात येणार भरून…-गावातील महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोंढाळा(देसाईगंज) :- ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ संपूर्ण महाराष्ट्रभर १ जुलै पासून लागू करण्यात आली आहे.या योजने अंतर्गत लाडक्या बहिणींना महिण्याकाठी दीड हजार रुपये देण्यात येणार आहे.काही महिलांना कागद पत्रांची जुळवाजुळव करण्याकरिता तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दमछाक होत आहे.अशातच अनेक महिलांकडून आर्थिक लुटीचे प्रकरण सर्वत्र उघडकीस येऊ लागले आहेत.अर्ज विक्री तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी बाह्यस्थ यंत्रणांकडून महिला वर्गांकडून बेसुमार पैश्यांची मागणी केली जात आहे.त्यामुळे गावातील महिलांना कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा त्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या मार्गदर्शखाली माजी महिला व बालकल्याण सभापती जिल्हा परिषद गडचिरोली रोषणीताई पारधी यांच्या वतीने महिलांना मोफत अर्ज वितरण व मोफत ऑनलाइन अर्ज भरून देण्याकरिता ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ मदत केंद्राचे उद्घाटन आज,दिनांक-७ जुलै रोजी करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वर्षे वय असलेल्या तळागाळातील महिलांना लाभ मिळावा तसेच कुणीही महिला वंचित राहू नये; याकरीता गावातील महिलांनी मोफत अर्ज वितरण व मोफत ऑनलाईन अर्ज भरून लाभ घ्यावा; त्याचबरोबर गावातील शेवटच्या महिलेचा फार्म भरेपर्यंत निरंतर मदत केंद्र सुरू राहणार असल्याची ग्वाही रोशनीताई पारधी यांनी दिली आहे.तसेच अर्ज भरतांना वा अर्ज वितरीत करतांना कुणीही पैश्याची मागणी केल्यास तक्रार करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

मदत केंद्राचे उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनील पारधी,गडचिरोली जिल्हा सचिव भाजपा युवा मोर्चाचे सचिन वानखेडे, मंगलाताई शेंडे माजी सरपंच ग्रामपंचायत कोंढाळा, गोकुल ठाकरे ग्रामपंचायत सदस्य कोंढाळा,महिला बचत गटाच्या पदाधिकारी व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

 (सदरचे मदत केंद्र हे कोंढाळा ग्रामपंचायतीच्या समोर आहे.)

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!