Thursday, September 10, 2026
Homeकोंढाळाउद्याला विनोदी अभिनेता भारत गणेशपुरे कोंढाळा नगरीत..

उद्याला विनोदी अभिनेता भारत गणेशपुरे कोंढाळा नगरीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-हास्य सम्राट तथा विनोदी अभिनेता भारत गणेशपुरे यांचे उद्या,बुधवार ११ मार्च रोजी दुपारच्या सुमारास देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा नगरीत आगमन होणार आहे.भारत गणेशपुरे हे ‘फू बाई फू’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ या मराठी टेलिव्हिजन शोमधील त्यांच्या विनोदी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत.उद्या बुधवारी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विशेष प्रचार आणि प्रसिद्धी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या मोहिमेला बळ देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता भारत गणेशपुरे उपस्थित राहणार आहेत.त्यांच्या या भेटीमुळे ग्रामपंचायत स्तरावरील विकास कामांना आणि लोकचळवळीला नवा उत्साह मिळण्याची शक्यता आहे.यावेळी ते पथकासोबत अभियानाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन नागरिकांशी संवाद साधतील.ग्रामपंचायत प्रशासनाने या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू केली असून जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाला उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!