Thursday, September 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमनात आले दिले छापून; न्यायलयाने फटकारताच मागितली माफी..!

मनात आले दिले छापून; न्यायलयाने फटकारताच मागितली माफी..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एखादा पत्रकार असो वा शैक्षणिक परिषद,मनात आले तर काहीही छापू शकत नाही. त्यास काही मर्यादा असते.मात्र,राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच एनसीईआरटी(NCERT-National Council of Educational Research and Training)ने इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात “न्यायपालिकेतील भ्रष्टाचार” असा उल्लेख केल्याने याबाबत सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करून फटकारताच बिनशर्त माफी मागावी लागली आहे.प्रकरणी एनसीईआरटीने सुधारित मजकूरासह पुस्तकाची नवीन आवृत्ती पुढील शैक्षणिक सत्र २०२६-२७ च्या सुरुवातीला इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाईल,अशी माहिती एनसीईआरटी कडून न्यायालयात देण्यात आली.
 इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकातील एका प्रकरणात न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा उल्लेख करण्यात आला होता.शालेय स्तरावर न्यायपालिकेबद्दल अशा प्रकारचा मजकूर प्रकाशित झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने याची स्वतःहून दखल घेतली.या प्रकरणावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करून स्पष्टीकरण मागितले.सर्वोच्च न्यायालयाच्या फटकारानंतर एनसीईआरटीने न्यायालयाची बिनशर्त माफी मागत हा मजकूर हेतुपुरस्सर समाविष्ट करण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले.संस्थेने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक संस्थांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता.मात्र,त्यामधील काही मजकूर चुकीच्या पद्धतीने मांडला गेला असल्याचे स्वतः एनसीईआरटीने मान्य करून याबाबत न्यायालयात माफी मागितली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!