Sunday, September 20, 2026
Homeकोंढाळाआज कोंढाळा येथे गरदेव जत्रा; गावात एक खडा तमाशा व दोन नाट्य...

आज कोंढाळा येथे गरदेव जत्रा; गावात एक खडा तमाशा व दोन नाट्य प्रयोगांचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आज,मंगळवार ३ मार्च रोजी रंगपंचमीच्या दिवशी गरदेव यात्रेला सुरुवात होऊन मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी उसळणार आहे.गरदेव पूजेची परंपरा गावातील बुराडे परिवार पिढ्यानपिढ्या जपत आहे.गावात गरदेव यात्रेनिमित्त आज रात्री ९ वाजेच्या सुमारास मोफत एक राष्ट्रीय दुय्यम खडा तमाशा व ‘बहिणीची वेडी माया’ तसेच ‘अंधारातील लाल दिवा’ या दोन नाट्य प्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज रंगपंचमीच्या दिवशी कोंढाळा गावातील मुख्य चौकापासून दत्त मंदिर परिसरातून गरदेव यात्रा निघणार असून,मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी उसळणार आहे.यात्रेनंतर प्रसादाचे वाटप केले जाईल.यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘गरदेव’ स्वरूपातील उंच-खांब आणि होकरे-होकरे म्हणत अंगावर शिपट्या खाणे.अनेक भाविक भक्त मोठ्या हौशीने शिपट्या खात असतात. जत्रेतील आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे  गावातील दत्त मंदिर परिसरात सकाळपासूनच विविध दुकाने सजली आहेत. गर्दी लक्षात घेता चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला जाऊ शकतो.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

आता शेतकऱ्यांना मोबाइल ॲपद्वारेही करता येणार ई-पीक पाहणी नोंदणी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाकडून महसूल विभागातील सहाय्यकांकडून ११ ऑगस्ट २०२६ पासून खरीप ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे.मात्र,काही तांत्रिक समस्येमुळे पीक पाहणीची प्रक्रिया अतिशय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!