Thursday, April 16, 2026
Homeबीडमोठी बातमी; भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उडवले पोलिस निरिक्षकाला…-पोलीस निरीक्षकाचा जागीच मृत्यू;...

मोठी बातमी; भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उडवले पोलिस निरिक्षकाला…-पोलीस निरीक्षकाचा जागीच मृत्यू; आजची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

बीड:- जिल्ह्यात अपघाताची मोठी दुर्घटना आज, रविवार दिनांक-७ जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे.विशेष म्हणजे यामध्ये एका पोलिस निरिक्षकालाच परीक्षेच्या बंदोबस्तसाठी जाताना भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उडवले आहे.यामध्ये पोलिस निरिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे.मच्छिंद्र नन्नवरे असे त्यांचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,बीडमधील नेकनूरच्या जवळ हा अपघात झाला आहे.नेकनूर पासून जवळच असलेल्या नन्नवरे वस्तीतून पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेच्या बंदोबस्तासाठी नन्नवरे जात होते.मात्र नेकनूर-मांजरसुंबा रस्त्यावर नेकनूर पासून जवळच कालिका मंगल कार्यालयासमोर नेकनूरच्या दिशेने जात असलेल्या चारचाकीने त्यांना जोरदार धडक दिली.विशेष म्हणजे समोरच्या दिशेने येत असलेल्या या गाडीने समोरून धडक दिल्याने नन्नवरे खाली पडले.तसेच कारही पुढे रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली.

दरम्यान,या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये हा अपघात नेमका कसा झाला याबाबत स्पष्टपणे दिसत आहे. आज,रविवारी सकाळी ही अपघाताची घटना घडली आहे.अपघात होताच कारचालक फरार झाला आहे.घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.कालिका मंगल कार्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेरेत ही घटना कैद झाली आहे.घटनेने नन्नवरे वस्ती व नेकनूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!