Monday, July 27, 2026
Homeकोंढाळासावधान..! कोंढाळा-मेंढा शेतशिवारात बिबट्याचा वावर..

सावधान..! कोंढाळा-मेंढा शेतशिवारात बिबट्याचा वावर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-हल्ली चंद्रपूर जिल्ह्यात मानवी जीवांवर वाढते वन्य प्राण्यांचे हल्ले वन विभागासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.काल, सोमवारी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील चकनिंबाळा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक-३७७ मध्ये चवताळलेल्या वाघाने अवघ्या २१ वर्षीय तरुणावर हल्ला चढवून ठार केल्याची घटना घडल्याने परिसरातील गावांमध्ये वाघाची प्रचंड दहशत पसरून नागरिक भयभीत झाले आहेत. चालू वर्षात एकट्या चंद्रपूर जिल्ह्याच्या विविध भागात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल नऊ जणांचा बळी गेला आहे.अश्यातच आता देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा-मेंढा शेतशिवारात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याची घटना नुकतीच उघडकीस आल्याने शेतकरी बांधवांसह गावकरी धास्तावले आहेत.विशेष म्हणजे, सोमवारच्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास वाळू डेपोवरील काही नागरिकांना शेत शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.कोंढाळा गावापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर पश्चिमेस मेंढा मार्गे शेतकरी बांधवांच्या शेत्या आहेत.सध्या उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आल्याने गावातील तसेच लगतच्या कुरुड गावातील शेतकरी दिवसा तसेच रात्रीच्या सुमारास शेतीला पाणी करण्यासाठी व इतर कामांसाठी शेतबांधावर जात असतात.त्यातच,काल सोमवारच्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास वाळू डेपोवरील काही नागरिक लगुशंकेसाठी उठले असता शेतशिवारात बिबट्या दिसून आला.प्रसंगावधान साधून उपस्थित नागरिकांनी आरडा-ओरड करताच बिबट्याने पळ काढला.सदरचा बिबट्या नजरेस पडल्याने मोठा अनर्थ टळला असला तरीही एखादी अनुचित घटना घडण्यापूर्वी वन विभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!