Monday, July 13, 2026
Homeनागपूरसर्व पैसे सिलेंडर खरेदीत खर्च करायचे; तर कमवायचे काय?

सर्व पैसे सिलेंडर खरेदीत खर्च करायचे; तर कमवायचे काय?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-राज्याच्या उपराजधानीत गेल्या काही दिवसांपासून सिलिंडरसोबतच घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, सर्वसामान्यांचे स्वयंपाकघर अक्षरशः विस्कळीत झाले आहे.एकीकडे गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत, तर दुसरीकडे जिल्हा प्रशासन सर्व काही ‘सुरळीत’ असल्याचा दावा करत आहे.प्रशासनाच्या या दाव्यामुळे संतप्त झालेल्या गृहिणींनी ‘विश्वास नक्की कोणावर ठेवायचा?’ असा जळजळीत सवाल उपस्थित केला आहे.विशेष म्हणजे,व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे मार्गावरील फूड विक्रेते संकटात सापडले आहेत.डोसा,नूडल्स,मंच्युरियन, दाबेली,तरी पोहे आदी खाद्य पदार्थांसाठी मोठ्या प्रमाणात गॅसचा वापर करावा लागतो.मात्र,गॅस मिळत नसल्यामुळे संबंधित खाद्यपदार्थ तयार करणेच बंद करावे लागले आहे.ब्लॅकमध्ये व्यावसायिक सिलिंडर तीन हजार रुपयांपर्यंत मिळत आहे.सर्व पैसे सिलिंडर खरेदीत खर्च करायचे तर कमवायचे काय? असा प्रश्न या विक्रेत्यांना पडला आहे.त्यामुळे अनेकांनी आता घरूनच इडली,उपमा तयार करून आणून विकण्यास सुरुवात केली आहे.काहींनी तर ठेल्यांवर भेळ विकण्यास सुरुवात केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!