Monday, August 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआजपासून वाढणार वादळी पावसाची तीव्रता..!

आजपासून वाढणार वादळी पावसाची तीव्रता..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आज,बुधवार १८ मार्चपासून ते २० मार्च दरम्यान वादळी पावसाची तीव्रता आणि क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.या काळात विदर्भ,मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता आहे.काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊ शकते.तर २१ मार्चपासून हवामान स्थिर होईल.मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची व पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी.अशा वेळी झाडाखाली,टिनशेडखाली,तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे,असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.विशेषतः देशाच्या अनेक भागांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून वादळ,पाऊस आणि गारपिटीचा जोर सुरू आहे.भारतीय हवामान खात्यानुसार,आज १८ मार्चपासून तीव्र वेस्टर्न डिस्टर्बन्स(पश्चिमी विक्षोभ) सक्रिय होत आहे.यामुळे जम्मू-काश्मीर,लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.तर पंजाब,राजस्थान, मध्य प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशात मेघगर्जनेसह वादळ आणि पावसाची शक्यता आहे.राजस्थानमध्ये दोन दिवस झालेल्या पाऊस आणि गारपिटीनंतर उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.सोमवारी राज्यातील अनेक शहरांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी नोंदवले गेले.रात्री थंडी वाढल्याने काही ठिकाणी किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या खाली गेले.उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासांत अनेक ठिकाणी हलका पाऊस आणि मेघगर्जना झाली.शामली जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटही झाली.पूर्व यूपीमध्येही हलक्या सरी पडल्या आणि काही भागांत वादळ आले.हवामान बदलल्याने तापमानात घट नोंदवली गेली आणि पारा ४० अंश सेल्सिअसच्या खाली आला.छत्तीसगडमध्ये काल मंगळवारी उष्णतेच्या लाटेत अचानक हवामान बदलले आणि अनेक ठिकाणी पावसासह गारपीट झाली. गरियाबंद जिल्ह्यातील आमामोरा-ओड डोंगर परिसरात दाट धुके पसरून जोरदार पावसासह गारापीठ झाली.तर एक दिवसापूर्वी गरियाबंद जिल्ह्यात वीज कोसळून एक तरुण भाजला होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!