Saturday, August 29, 2026
Homeचंद्रपूरमैत्रिणींसोबत खेळत असतांना अचानक खाली कोसळली अन् क्षणात जीव गमावून बसली..

मैत्रिणींसोबत खेळत असतांना अचानक खाली कोसळली अन् क्षणात जीव गमावून बसली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या भद्रावती शहरात एक हृदयद्रावक घटना मंगळरवाच्या सायंकाळी उघडकीस आली.एका १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मैत्रिणींसोबत बॅडमिंटन खेळता-खेळता अचानकपणे तोल गेला आणि ती खाली कोसळली.यात डोक्याला गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला.अनुष्का अजय यादव वय १६ वर्षे,रा.आयुध निर्माणी वसाहत,भद्रावती,जि.चंद्रपूर असे मृत पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती ११ व्या वर्गात शिक्षण घेत होती.
अनुष्का ही नेहमीप्रमाणे मैत्रिणींसोबत काल मंगळवारच्या सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास आपल्या वसाहतीसमोरील खुल्या मैदानात बॅडमिंटन खेळत होती.खेळता-खेळता ती अचानकपणे खाली कोसळून मुख्य मार्गावर पडल्याने अनुष्काच्या डोक्याला गंभीर मार लागला.डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊ लागल्याने उपस्थित मैत्रिणींनी आरडा-ओरड करताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत तिला तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयात उपचार सुरू असतांनाच अनुष्काची प्राणज्योत मालवली. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून यादव कुटूंबीय शोकसागरात बुडाले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!